सातारा

प्रतिक्षा संपली! पंधरा दिवसांत सातारकरांना मिळणार कोरोनाची लस

उमेश बांबरे

सातारा : कोरोनाची लस कधी येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील 22 हजार कर्मचाऱ्यांना लशीकरण केले जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने शासनाच्या "ऍप'वर नोंदणीही केली आहे. जिल्ह्यात येत्या 15 दिवसांत लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लशीकरण होणार आहे.
 
कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी दुसरी लाट येण्याची भीतीही व्यक्त होत आहे. अशातच बाहेरच्या देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झालेला आहे. त्यामुळे आपल्याकडेही पुन्हा कोरोनाची साथ वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे बाहेरच्या देशातून येणारी सर्व विमाने बंद केली आहेत, तर कमी झालेली रुग्णसंख्या लक्षात घेता आणखी संसर्ग वाढू नये म्हणून लशीकरण केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने लशीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात "हाय रिस्क'मधील नागरिक व कोरोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या लशीची वाट सर्व जण पाहात आहेत. लशीकरणासाठी राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांतून आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केलेली आहे. ही संकलित माहिती शासनाने लशीकरणासाठी तयार केलेल्या "ऍप'वर भरली जात आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला लस उपलब्ध होणार आहे. सातारा जिल्ह्यातून आरोग्य विभागाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती शासनाच्या लशीकरणासाठी तयार केलेल्या "ऍप'वर भरलेली आहे.

पाचगणीत हनी ट्रॅप; पिंपरी चिंचवडच्या युवतीसह चाैघांना अटक

यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्या परिचारिका, वॉर्ड बॉय, वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. साधारण 22 हजार 435 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी केलेली आहे. यामध्ये 116 शासकीय आरोग्य संस्थांकडून 14 हजार 281 आरोग्य कर्मचारी, 614 खासगी आरोग्य संस्थांकडून 8154 आरोग्य कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ही लस ठेवण्यासाठी 160 रेफ्रिजेटर, 140 डिप फ्रिजर, वॉकिंग कुलर, 191 कोल्ड बॉक्‍स, 2073 वॅक्‍सिन कॅरिअर ही उपकरणे तयार ठेवली आहेत.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कऱ्हाडात 100 वाहनांवर पोलिसांची कारवाई

जिल्ह्यात जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात साधारणतः 15 जानेवारी पर्यंत कोरोना लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, त्यानंतर पोलिस, हाय रिस्क असलेले नागरिक यांना लस दिली जाणार आहे. लशीकरणासाठी ऍपवर नोंदणी केलेल्यांमध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्या परिचारिका, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, नर्स, वैद्यकीय अधिकारी, तसेच खासगी रुग्णालयांतील सर्व आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pollution Control : 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम प्रभावीपणे राबविणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Latest Marathi News Updates Live: अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका: “महापालिकेच्या भीतीने एकत्र आले तरी पराभव ठरलेलाच”

PM Narendra Modi: पूराच्या वेदनेत दिलासा ठरली मोदींची भेट; निकिताच्या अश्रूंनी पंतप्रधानांचे मन हेलावले

Pitru Paksha 2025: पितरांची मृत्यू तिथी माहिती नाही? 'या' अमावास्येला करा श्राद्ध, मिळतील पूर्वजांचे आशीर्वाद

Nashik News : सुरक्षित अन्न खा, आरोग्य जपा; नाशिक ‘एफडीए’ची सणासुदीच्या काळात विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT