सातारा

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पदाधिका-यांना हमी; मंत्री मुश्रीफांच्या निर्णयाकडे लक्ष!

Balkrishna Madhale

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असताना ऑक्सिजन, हेंटिलेटर, बेड उपलब्ध होत नाहीत अशी विदारक परिस्थिती आहे. त्यामुळे १४ व्या वित्त आयोगाच्या रक्कमेवरील व्याजातून प्रतिशक्ती वाढण्याची औषधे खरेदी करण्याऐवजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शंभर ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारा, अशी एकमुखी मागणी पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. याबाबत शासनाकडे सोमवारी प्रस्ताव पाठवून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्ष उदय कबुले यांनी दिले.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच व्हिडिओ काॅन्फरसिंगव्दारे झाली. शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण कल्पना खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे आदी उपस्थित होते. महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ यांच्यासह अनेक सदस्य व्हीसीव्दारे सहभागी झाले.

१४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना वितरित केलेल्या रकमेवरील व्याजाच्या रकमेतून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० आणि आयुर्वेदिक संशमनीवटी, युनानी औषध खरेदी करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने केल्या होत्या. औषधांचे वाटप करण्याऐवजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शंभर ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी सदस्यांनी या सभेत केली. 

उदय कबुले, मंगेश धुमाळ, संजीवराजे नाईक-निंबाळकर, भीमराव पाटील, वसंतराव मानकुमरे, अर्चना देशमुख, डाॅ. भारती पोळ, अरुण गोरे यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत कोविड सेंटरसाठी आग्रही भूमिका घेतली. याबाबत जिल्हा परिषदेकडून ग्रामविकास विभागास प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. शासनाने व्याजाचे सुमारे सात कोटी रुपये यासाठी खर्च करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शासनाकडे करण्याचा निर्णय या सभेत झाला. 

या कामात दिरंगाई न करता आठ दिवसांच्या आत हा प्रश्न मार्गी लावून जिल्हावासियांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी संजीवराजे यांनी केली. सध्याच्या बिकट परिस्थितीत ऑक्सिजन बेड, रेमडिसीवर इंजेक्शन, व्हेंटिलेटर याची जास्त आवश्यकता असल्याने तसा शासनाकडे प्रस्ताव देण्यात येणार असून सोमवारी ग्रामविकास मंत्र्यांशी बोलून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे कबुले यांनी स्पष्ट केले. 

होम आयसोलेशनमधील रुग्णांना जिल्हा परिषदेमार्फत कीट देण्याचा निर्णय झाला होता. अद्याप कीट मिळत नसल्याचे भीमराव पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. आरोग्य विभागात सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता असून कीट पोहचवण्याबाबत सूचना करण्यात आल्याचे कबुले यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रेमडिसीवर इंजेक्शन जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी भीमराव पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT