सातारा

गढूळाचं पाणी कशाला ढवळीलं..; कोरेगावात 13 आंदोलकांवर गुन्हा!

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाने आता वेगळेच वळण घेतले आहे. गढूळ, मातीमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याच्या कारणावरून नगराध्यक्षांच्या दालनात प्रतीकात्मक महाळ घालून नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीचा निषेध करणाऱ्या आंदोलकांविरुद्ध नगराध्यक्षांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, याप्रकरणी आंदोलकांसह 13 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

गढूळ, मातीमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याबाबतचे निवेदन देण्यासाठी शहरातील नागरिकांसह सोनेरी ग्रुपचे काही सदस्य बुधवारी (ता. नऊ) नगरपंचायत कार्यालयात गेले होते. निवेदन स्वीकारण्यासाठी नगराध्यक्ष अथवा कोणीच सदस्य येत नसल्याचे दिसताच संतप्त झालेल्या नागरिकांनी नगराध्यक्षांच्या दालनात प्रतीकात्मक महाळ घालून नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. दरम्यान, मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी निवेदन घेऊन आलेल्या नागरिकांशी चर्चा करून दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही त्यांनी दिल्याचे आंदोलकांनी सांगितले होते. 

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा रेश्‍मा कोकरे यांनी आंदोलकांसह 13 जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनातील टेबलवर महाळ घालण्याचे आंदोलन करून या आंदोलनाची छायाचित्रे व्हॉट्‌सऍपवर प्रसिद्ध केली आणि नगराध्यक्षपदावरील कामकाजाबद्दल बदनामी केली, तसेच बेकायदा जमाव जमवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजित बर्गे, कोरेगाव युथ फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अमर देशमुख, डेकोरेटर्स संघटनेचे सूरज पवार यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

आंदोलकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार 
शहरात गेले वर्षभर पाण्यासाठी संघर्ष सुरू असून, नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही नगरपंचायतीच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. पाण्यासाठी निवेदन घेऊन आलेल्यांना सामोरे जाण्याऐवजी त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणाऱ्या नगराध्यक्षांच्या विरोधात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली असून, सोमवारी प्रत्यक्ष भेटून नगरपंचायतीतील कारभार व पती हस्तक्षेपाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे व अजित बर्गे यांनी सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

T20 World Cup AUS vs IRE : संकटांवर मात करत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला; आयर्लंडने स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडाळला

Latest Marathi News Live Update :जालन्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

Abhishek Sharma : हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अभिषेकबाबत महत्त्वाची अपडेट्स; आजारी पडायला मुंबईत नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT