Satara Latest Marathi News 
सातारा

गोजेगावातून 15 लाखांचे साहित्य चोरीस; विक्रांता कंपनीत काम करणाऱ्या दोघांवर साताऱ्यात गुन्हा

गिरीश चव्हाण

सातारा : वीज वितरण कंपनीचे काम करणाऱ्या एका कंपनीचे गोजेगाव आणि शेंद्रे (ता. सातारा) येथून लोखंडी खांब, रोकड, तसेच इतर साहित्य चोरून नेल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांत दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथील वैभव बर्गे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

वीज वितरण कंपनीच्या वतीने विक्रांता इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी गोजेगाव आणि शेंद्रे (ता. सातारा) परिसरात विद्युत खांब उभारणीचे काम करत आहे. या कंपनीत चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथील वैभव बर्गे आणि हुबळी येथील संदीप पावसकर हे दोघे कामास होते. या दोघांनी फेब्रुवारी, तसेच मार्च महिन्यात वीज वितरणच्या कामासाठी आणलेले 32 खांब, कंडक्‍टर, फॅब्रिकेशनचे साहित्य, बांधकाम साहित्य, मशिन्स, कर्मचारी, तसेच इतरांच्या पगारासाठी आणलेली 1 लाख 93 हजारांची रोकड असा सुमारे 15 लाख 21 हजारांचे साहित्य चोरून नेले. साहित्य चोरीस गेल्याचे कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्याची तक्रार रघुनाथ हेमंत दुबे (रा. पिरवाडी, सातारा) यांनी काल सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदवली. यानुसार पोलिसांनी बर्गे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याचा तपास हवालदार मालोजी चव्हाण करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

Patna Mother Murder : मुलानेच आईला जिवंत जाळलं; पोलिसांना म्हणाला- ‘मी देवाचा अवतार, कलियुग सुरूय, मीच तिला संपवलं'

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; TMC नाव आणि पारंपरिक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

Badrinath Military Exhibition : बदरीनाथमध्ये मुख्यमंत्र्यांचा रायफल हातात घेत नेमबाजीचा सराव; लष्करी प्रदर्शनाची घेतली पाहणी

SCROLL FOR NEXT