सातारा

शिवथरात शेतीच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी; 7 जणांवर गुन्हा

गिरीश चव्हाण

सातारा : शेताच्या कारणावरून शिवथर (ता. सातारा) येथे काल दोन गटांत मारामारी झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करून सात जणांवर गुन्हा नोंदविला आहे. 

उषा चंद्रकांत माने (रा. शिवथर) यांनी नोंदविलेल्या फिर्यादीत, मुलासमवेत त्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. शेतास पाणी पाजत असतानाच त्याठिकाणी सदाशिव हरी बल्लाळ, विशाल सदाशिव बल्लाळ, विक्रम सदाशिव बल्लाळ, आशा सदाशिव बल्लाळ (रा. शिवथर) हे आले. त्यांनी मोटार बंद करत शेतात काम करायचे नाही, असे म्हणत दगड, लाथाबुक्‍यांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार सदाशिव बल्लाळ यांच्यासह चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

हवालदार बागवान तपास करीत आहेत. सदाशिव हरी बल्लाळ (रा. शिवथर) यांनी नोंदविलेल्या परस्परविरोधी फिर्यादीत, शेतात काम करताना त्या ठिकाणी चंद्रकांत मारुती माने, अमोल चंद्रकांत माने, उषा चंद्रकांत माने हे आले. त्यांनी शेतात काम करायचे नाही, असे म्हणत पायावर विळ्याने मारहाण केल्याचे नमूद केले आहे. हवालदार कदम तपास करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood : नेपाळमध्ये पुन्हा पूराचा धोका; तिबेटमध्ये धरण फुटल्याने अलर्ट

Who is Sonal Dinusha? भारताविरुद्ध दोन सामन्यात तीन शतकं ठोकणारा दिनूशा आहे तरी कोण? श्रीलंकेला सापडलाय हिरा

Pune Tejaswini Bus: महिलांसाठीची ‘तेजस्विनी’ बस पुरुषांनी व्यापली! महिला प्रवाशांना जागा नाही, पीएमपीच्या निर्णयावर संताप

Marathi News Live Updates : पंकजा मुंडे, आदिती तटकरे यांनी बांधली धनंजय मुंडेंना राखी; भावाने दिला आशीर्वाद

Pune Mumbai Intercity: पुणे-मुंबई इंटरसिटीच्या डबे वाढवण्याला ‘ब्रेक’; फलाट आणि पिट लाइन अपुरी, प्रवाशांना नाहक फटका

SCROLL FOR NEXT