सातारा

अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलांवर अत्याचार; फलटणमधील दोघांची बालसुधार गृहात रवानगी

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : मोबाईलवर अश्‍लील व्हिडिओ दाखवून नऊ व दहा वर्षांच्या मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फलटण शहरातील दोन अल्पवयीन मुलांवर बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा नोंद झाला. या दोघांनाही सातारा येथे बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. 

फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील 16 व 17 वर्षे वयोगटातील मुलांनी शेजारी राहात असलेल्या आठ व नऊ वर्षांच्या मुलांना मोबाईलवर गेम दाखविण्याचे आमिष दाखवित त्यांच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. नऊ सप्टेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत घरालगत असलेल्या शौचालयाच्या पायरीवर व घरी कुणी नसताना हा प्रकार घडला आहे. या मुलांनी या प्रकाराची कल्पना घरी दिल्यानंतर कुटुंबीयांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची सातारा येथील बाल सुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारी तपास करीत आहेत. 

दरम्यान, लहान मुलांकडून मोबाईलचा चुकीचा वापर झाला, की अशा प्रकारची गैरकृत्ये घडतात. त्यामुळे मुलांकडे जास्त वेळ मोबाईल देणे धोकादायक आहे. मुलांकडे मोबाईल असताना ते मोबाईलवर काय पाहतात याकडे पालकांनी लक्ष ठेवणे अत्यंत आवश्‍यक आहे. मुले मोबाईल वापरताना पालकांनी सजग राहावे, असे आवाहन फलटण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

Rajaram Puri Ganesh Procession : पहिल्याच दिवशी ओलांडली आवाजाची मर्यादा राजारामपुरी गणेश आगमन मिरवणूक ; आकर्षक विद्युत रोषणाई, ‘सिग्नल’मुळे वेळेचे गणित बसले

SCROLL FOR NEXT