Satara Latest Marathi News 
सातारा

टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितले म्हणून मद्यधुंद पतीने पत्नीच्या डोक्‍यात घातला दगड

महेश बारटक्के

कुडाळ (जि. सातारा) : मद्यधुंद पतीने पत्नीच्या डोक्‍यात दगड घालून आईलाही काठीने बेदम मारहाण केली असल्याची घटना सोनगाव (ता. जावळी) येथे घडली. याप्रकरणी विनोद बबन शिंदे (वय 38) याच्या विरोधात कुडाळ पोलिस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील टीव्हीचा आवाज पत्नीने कमी करण्यास सांगितले म्हणून रागात आलेल्या मद्यधुंद पती विनोद शिंदे याने दाराजवळील असणारा दगड उचलून थेट पत्नीच्या डोक्‍यात घातला. हा सर्व प्रकार सुरू असतानाच मध्यस्थी करणाऱ्या आईला देखील घरात असणाऱ्या काठीने बेदम मारहाण करून जखमी केले. यासंदर्भात पत्नी पल्लवी शिंदे यांनी पती विनोद शिंदे याच्या विरोधात कुडाळ पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कदम करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT