Jawali Taluka esakal
सातारा

जावळीत 65 वर्षाच्या वृध्दाचा 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

महेश बारटक्के

कुडाळ (सातारा) : जावळी तालुक्यातील (Jawali Taluka) नेवेकरवाडी येथील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले असल्याची घटना कुडाळ पोलीस ठाण्याच्या (Kudal Police Station) हद्दीत घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडालीय. या प्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय 65, रा. नेवेकरवाडी ता. जावळी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पीडित मुलीच्या आजीच्या तक्रारीवरुन नराधम वृध्दाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मेढा पोलिसांनी (Medha Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलगी हिला हाताने इशारा करून 'इकडं ये' असे म्हणाल्याने पीडित मुलगी आरोपीकडे गेली असता, आरोपीने पीडितेस 'चल', असा म्हणाला असता पीडित मुलगीने नकार दिला. तेव्हा आरोपीने पीडितेच्या डाव्या हाताला धरून जबरदस्तीने जवळील शेतातील छपरात नेले. त्या वेळी पीडित मुलीची मैत्रीण तेथून पळून गेली, तेव्हा आरोपी बबलिंगने पीडित मुलीस छपरात नेऊन तिथं तिच्याशी बळजबरी केली. तसेच नको, त्या ठिकाणी त्याने तिला स्पर्श केल्याचा आरोप आहे.

पीडित मुलगी जोरजोरात ओरडल्याने आरोपी तेथून पळून गेला. त्यानंतर पीडित मुलीच्या आजीच्या तक्रारीवरुन नराधम वृध्दाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जावळी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात तीन वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. नमूद गुन्ह्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांनी भेट दिली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने अधिक तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT