One sided love esakal
सातारा

एकतर्फी प्रेमातून भरदिवसा युवतीचा गळा चिरून खून

कृष्णात साळुंखे

चाफळ (सातारा) : येथील स्वागत कामानीजवळच भरदिवसा एकतर्फी प्रेमातून (One sided love) युवतीचा गळा चिरून एकाने खून केला. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या थरार नाट्यामुळे चाफळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. चैतन्या बाळू बंडलकर (वय १८) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. अनिकेत मोरे (२२, रा. शिंरबे, ता. कोरेगाव) असे खून करणाऱ्या युवकाचे नाव आहे. खुनानंतर अनिकेत पोलिसांत जावून हजर झाला आहे. त्याने गुन्हाही कबूल केल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. मल्हारपेठ पोलिस (Malharpeth Police) घटनास्थळी पोचले आहे. कऱ्हाडचे पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटीलही (Police Ranjit Patil) घटनास्थळी दाखल झाले आहेत. खून झालेली चैतन्या व संशयित अनिकेत दोघेही कोरेगाव तालुक्यातील आहेत. चैतन्याचे मूळगाव वाठार किरोली, तर संशयित अनिकतचे गाव शिरंबे (ता. कोरोगाव) आहे.

चाफळ येथील स्वागत कामानीजवळच भरदिवसा एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून एकाने खून केला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : चैतन्या हिची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. त्याची काही दिवसांपूर्वी चाफळनजीकच्या नानेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली आहे. त्यामुळे त्या मुलीसह चाफळला राहतात. संशयित अनिकेत व चैतन्य एकाच तालुक्यातील असल्याने त्यांचा परिचय होता. त्यात अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेमही होते. त्यातून तो तीला भेटायला येत होता. अनिकेतने मागील काही दिवसापूर्वी चैतन्याच्या आईची भेट घेवून लग्नासाठी मागणी केली होती. अनिकेत मजुरीवरील शेतातील कामे करतो. मात्र, पुढे काही झाले नाही.

अनिकेत आजही चाफळा दुचाकीवरून आला होता. येथील स्वागत कमानीजवळ तो चैतन्याला भेटला. त्यांच्यात काही बेलणे होण्यापूर्वीच त्याने तीचा तोंड दाबून त्याच्याकडे असलेल्या चाकूने तीचा गळा चिरला. त्यात ती जागीच ठार झाली. सकाळी दहाच्या सुमारास थरार नाट्य घडले. त्यामुळे ग्रामस्थांत धावपळ उडाली. भर चौकात झालेल्या थरार नाट्यामुळे ग्रामस्थांत घबराट पसरलीय. खुनानंतर सशयित अनिकेत पोलिसांत हजर झाला आहे. त्यावेळी पोलिसांनी खुनाची माहिती समजली. त्यांचीही धावपळ उडाली. त्वरित त्याची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली असून कऱ्हाडचे पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, मल्हारपेठचे फौजदार अजित पाटील, संतोष पवार घटनास्थळी दाखल झाले आहेत. तेथे पोलिसांनी पंचानामा करण्यास सुरवात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT