सातारा

जावळीतील मार्ली घाटात सांगली जिल्ह्यातील कुटुंबास संपविले; एसपींची घटनास्थळी धाव

विजय सपकाळ

मेढा (जि. सातारा)  : जावळी तालुक्यातील मेढयाच्या उत्तरेला असलेल्या मालदेव परिसरातील दिवदेव मार्ली घाटात दोन मुलांसह आई वडीलांचा असे या चौघांचे संपुर्ण कटुंबांचा आर्थिक व्यवहाराच्या देवाण घेवाणीतून खून केल्याचे जावळीतील सोमर्डीमधील संशयित योगेश निकम याने केल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

खून करून मृतावस्थेत टाकलेल्या पती-पत्नीच्या दाम्पत्यानंतर त्यांच्या दोन मुलाचाही याच घाटात मृतदेह सापडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमर्डी (ता. जावली) येथील संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चौघांच्या खुनाची कबुली दिली आहे.

मृत कुटुंब सांगली जिल्ह्यातील बामणोलीचे असून घटनेचे कारण मुलांना नोकरीला लावतो असे आमिष दाखवून मृत कुटुंबाकडून सुमारे एक ते दोन लाख रूपये घेवून मुलांना नोकरीला न लावल्यामुळे त्याच्याकडे पैसे द्या अशी मागणी करू लागल्याने संशयित नराधमाने पैशाच्या हव्यासापोटीच हे कृत्य केल्याचा पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

तानाजी विठोबा जाधव (वय 55), पत्नी सौ. मंदाकिनी जाधव (वय 50), मोठा मुलगा तुषार जाधव (वय 26) व छोटा मुलगा विशाल जाधव (वय 20) अशी खून झालेल्या चौघांची नावे आहेत. हे सर्वजण दत्तनगर, बामणोली, ता. मिरज, जि. सांगली येथील राहणारे आहेत. खून प्रकरणी योगेश निकम (रा. सोमर्डी, ता. जावळी) या संशयिताला ताब्यात घेवून याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मेढाच्या उत्तरेला दिवदेव - भिलार या मार्गावर मार्ली घाट लागतो. सुमारे 28 किलाे मीटर घाट असून हा संपूर्ण मार्ग सुनसान आहे. या मार्गावर अत्यंत कमी प्रमाणात वाहतूक असते. दिवसभरात एखादे-दुसरेच वाहन या घाटातून जाते. 11 ऑगस्ट रोजी पोलिसांना पाहिला पुरुष जातीचा एक मृतदेह या घाटात आढळला होता. त्यानंतर याच मार्ली घाटात शनिवारी ता. २९ आणखी एक अनोळखी महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. हे मृतदेह पती-पत्नीचे असल्याचे रविवारी पोलिस तपासात निष्पन्‍न झाले.

त्यानंतर ता. ३१ रोजी मृतदेह व त्यानंतर आज ता. एकला एक असे चार मृतदेह सापडले. दरम्यान पोलिस तपासात या चोघांचेही खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी सोमर्डी (ता. जावळी ) येथील योगेश निकम या युवकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने दिलेल्या कबुली जबाबामुळे पोलिसांचे डोकेही चक्रावले. या संशयिताने पती-पत्नीच्या खुनासह त्यांच्या दोन्ही मुलांना संपवल्याचीही कबुली त्याने दिली आहे.. कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात या चौघांचीही मिसिंग केस दाखल असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. पती-पत्नीचे मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना मेढा पोलिस ठाण्यात ओळख पटवण्यासाठी बोलावले असता त्यांनी मृत व्यक्ती त्यांच्याच नात्यातील असल्याचे सांगितले आहे.

संशयित योगेश याची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर अनेक धक्‍कादायक बाबी समोर आल्या. त्याने दोन मुलांचाही खून केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांचे मृतदेह शोधण्याची मोहिम सोमवारी दुपारपासून हाती घेतली. त्यानुसार संशयित योगेशला घटनास्थळी मार्ली घाटात नेण्यात आले. सोमवारी सायंकाळी एका मुलाचा मृतदेह सापडला. आज दुसर्‍या मुलाचा मृतदेह सापडला आहे.

संशयिताने हा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला असून त्यामुळे पोलिसही हादरून गेले. तुषार व विशाल या मुलांना मिल्ट्रीमध्ये भरती करतो, असे संशयित योगेश निकमने सांगितले होते. त्यानुसार या मुलांना संशयिताने सातारला बोलावले. तेथून त्यांना दिवदेव मार्ली घाटात मिल्ट्रीचे ट्रेनिंग सेंटर असून तेथे आपल्याला जायचे आहे असे सांगून नेले. तेथे नेल्यानंतर या दोघांना गुंगीचे औषध देवून डोक्यात घाव घालून उंच कड्यावरुन ढकलून दिल्याची कबुली संशयिताने दिल्याचे पोलिसांनी माहीती दिली. संशयिताने दोन्ही मुलांना संपवल्यानंतर या मुलांच्याच मोबाईलवरुन त्यांच्या आई वडिलांशी संपर्क साधला व त्यांनाही मुलांचे ट्रेनिंग सेंटर पाहण्यासाठी सातार्‍याला बोलावून घेतले. तेथून त्यांना दिवदेव मार्ली घाटात नेवून प्रथम त्यांन गुंगीचे औषध देत त्यांचाही या संशयिताने खून केल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वि सातपुते, अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून तपासासाठी सहकार्‍यांना सुचना केल्या.

कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष चामे, संजय शिर्के, डी. डी. शिंदे अधिक तपास करत आहेत. मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्याचे काम भर पावसात महाबळेश्वर ट्रेकर्स व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रेकर्स यांनी मृतदेह अथक परीश्रमातून काढले. तुमच्यामुळेच मृतदेह बाहेर निघाले तुमच्या सहकार्य मोठे असे सांगून त्यांचे जिल्हा पोलिस प्रमुख यांनी केले कौतुक.

 कोरोनाचा रोगाचा असाही वापर.

त्या मुलांच्या आई वडीलांना बोलावून तुम्हांला मुलांना बघायला नेतो असे सांगून त्यांना बोलावले त्यानंतर तुम्हांला कोरोना होवू नये म्हणून इंजेक्शन घ्या असे सांगून त्यांना इंजेक्शन देवून बेशुध्द करून खून केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT