Crop Sowing esakal
सातारा

कऱ्हाड दक्षिणमध्ये पावसाच्या ओढीने दुबार पेरणीचे संकट!

सचिन मोहिते

काले (सातारा) : पावसाने (Heavy Rain) आठ दिवसांपासून दडी मारल्यामुळे विभागात दुबार पेरणी व टोकणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी Farmers हवालदिल झाला आहे. दक्षिण विभागातील (South Division) शेती माळरान व काही ठिकाणी मुबलक पाणी असलेली आहे. मे महिन्याच्या शेवटी येळगाव, येणपे परिसरात धूळवाफ पेरणी झाली. (Crisis Of Sowing In Karad South Division Due To Lack Of Rain Satara Marathi News)

पावसाने आठ दिवसांपासून दडी मारल्यामुळे विभागात दुबार पेरणी व टोकणीचे संकट ओढावले आहे.

सोयाबीन, भुईमूग, भात पिकासह कडधान्ये पिकांची पेरणी, टोकण वेळेवर झाली. पेरणीसाठी (Crop Sowing) आवश्यक पाऊस बरसला. त्यामुळे बळीराजाने आनंदाने बी-बियाणे मातीमध्ये गाडले. पिकांची उगवण चांगली झाली. ऊस लावणीसाठी पोषक वातावरण होते. याचा फायदा उचलत ऊस लागणी झाल्या. शेतातील ओलीवर पिकांची वाढ व उगवण झाली. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे पेरलेली व उगवून आलेली पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत.

चार दिवसांत पाऊस झाला नाही तर पुन्हा उगवलेली पिके वाया जाणार आहेत. पेरणीसाठी आवश्यक आलेले बी-बियाणे किंमत जास्त दराने शेतकऱ्यांनी खरेदी केली आहेत. पेरणीचा टोकणीचा, खतांचा, मजुरांचा खर्च, दुकानदार खर्च नुकताच शेतकऱ्यांनी भागवला आहे. तोच पुन्हा दुबार पेरणीचे संकट उभे आहे. त्यामुळे दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे.

Crisis Of Sowing In Karad South Division Due To Lack Of Rain Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT