crop damage due to satara rain sugarcane worker also hit farmer agriculture Sakal
सातारा

Satara News : शेतकऱ्यांच्या कष्टावर पावसाचे पाणी; कऱ्हाडला सोयाबीन, हायब्रीड, भात पीक भिजले ,ऊसतोड मजुरांनाही फटका

खरीप हंगामात अपेक्षित पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने खरिपातील पिके जगवली.

हेमंत पवार

कऱ्हाड : खरीप हंगामात अपेक्षित पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने खरिपातील पिके जगवली. सध्या त्यांची काढणी सुरू आहे. मात्र, अशातच पावसाने हजेरी लावल्याने काढणी झालेले भात, सोयाबीन, हायब्रीड भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावरच पाणी फेरल्यासारखी स्थिती झाली आहे.

साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यात दाखल झालेल्या ऊसतोड मजूर स्थिरस्थावर होत असतानाच अवकाळीने हजेरी लावली. त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या चंद्रमोळ्या झोपड्यांत पाणी जाऊन त्यांचे जीवनावश्यक साहित्य भिजून नुकसान झाले. त्यामुळे त्यांना निवारा शोधण्याची वेळ आली आहे.

भात, सोयाबीन काढणी लांबणीवर

सोयाबीन पिकाची काढणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. अशातच पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणचे सोयाबीन पाण्यातच आहे. त्याचबरोबर भाताची काढणीही अंतिम टप्प्यात आहे. त्यातच पाऊस आल्याने शेतात ओल आहे. त्यामुळे भात, सोयाबीन काढणी लांबणीवर जाणार आहे.

तोडलेल्या उसासाठी शेतकऱ्यांची पदरमोड

साखर कारखाने सुरू झाल्यामुळे गेल्या आठवड्यापासून ऊसतोडी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काल ऊस तोडून ऊसतोड मजुरांनी शेतात ठेवला होता. मात्र, मध्यरात्रीनंतर आलेल्या पावसाने शेतातील ऊस बाहेर काढण्याचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी, संबंधित शेतकऱ्यांना पदरमोड करून मजुरांमार्फत तोडलेला ऊस शिवारातून बाहेर काढण्याची वेळ आली.

ऊसतोडी थांबवाव्या लागणार

साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. ऊसतोड मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मात्र, पावसाने अनेक शिवारात पाणी साचून राहिल्याने आणखी एक-दोन दिवस तरी ऊसतोडी बंद ठेवाव्या लागतील, असे चित्र आहे.

व्यावसायिकांनाही फटका

ऐन थंडीत वादळी पावसाने दिवाळीच्या तोंडावर हजेरी लावली आहे. त्यामुळे बाजारपेठेत साहित्य विक्रीसाठी बसणारे छोटे किरकोळ दुकानदार, फटाका विक्रेते, रस्त्यावर बसून सिझनल माल विकणारे, स्टॉलधारकांना पावसाचा फटका बसला आहे. पावसाने बाजारपेठेत ग्राहक कमी असल्याने त्यांच्या विक्रीवरही परिणाम झाला आहे.

अशी आहे नुकसानीची स्थिती...

  • काढणी झालेले सोयाबीन, भात, हायब्रीड भिजून नुकसान

  • काढणी राहिलेली खरिपातील पिके शेतातच

  • पावसाचे पाणी शिवारात साचून ऊसतोडी थांबल्या

  • ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांत पाणी जाऊन नुकसान

  • शेतातील ओल हटल्याशिवाय काढता येणार नाहीत पिके

पावसाची आकडेवारी

(मंडलनिहाय मिलिमीटरमध्ये)

  • कऱ्हाड - ४२.५

  • उंब्रज - २१.८

  • इंदोली -६.०८

  • सुपने - ३०

  • मसूर - ६

  • कवठे -१७.८

  • कोपर्डे हवेली - १८.३

  • सैदापूर - ३७.८

  • शेणोली - ३६

  • कोळे - ४१.३

  • काले - ४.३

  • मलकापूर - ८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

Silver Import: सोनेनंतर आता चांदीवरही केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवे नियम लागू केले; आता अतिरिक्त मंजुरी लागणार

KKR vs GT: 22 Sixes...! फिन ऍलेन, रघुवंशीची वादळी खेळी, पण शतक हुकलं; कोलकाताने IPL 2026 मध्ये कोणालाच न जमलेला पराक्रम केला

SCROLL FOR NEXT