सातारा

कऱ्हाड तालुक्‍यात आठशे एकरांवरील पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने घेतलेली खरीप हंगामातील पिके त्यांच्या डोळ्यादेखत वाया गेली. वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यामध्ये तालुक्‍यातील 179 गावांतील शेतकऱ्यांचे सुमारे 800 एकरांवरील नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग व खरीप ज्वारी या पिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 

वादळी पावसाने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. सलग चार दिवस पाऊस पडल्याने ऐन खरीप हंगामातील पिके काढण्याच्या टप्प्यातच पाऊस आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतात पाणी साचून काढणीस आलेल्या पिकांवरच पाणी फिरले. काढणी सुरू असतानाच सोयाबीन पाण्यात गेले. भुईमुगाच्या शेंगांना जमिनीखालीच मोड आले, भात आणि ऊस पीक पावसाने जमीनदोस्त झाले. खरीप ज्वारी काळी पडली. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकांनी पंचनामे केले.

तालुक्‍यातील 179 गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत 122 गावांतील नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. त्यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग, खरीप ज्वारी, भाजीपाल्याचा समावेश आहे. सुमारे 700 एकरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीस आलेली पिके मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात यंदाच्या हंगामातून काहीच उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे शासनाने तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील निगडी, घोलपवाडी, गायकवाडवाडी या गावांना वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. तेथे प्रामुख्याने खरीप ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. त्या गावातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यात पावसाने नुकसानीचे पंचनामे पूर्णत्वाकडे आले आहेत. सुमारे 325 हेक्‍टरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. भात, सोयाबीन, भुईमूग व खरीप ज्वारीचे मोठे नुकसान आहे. 
-रियाज मुल्ला, तालुका कृषी अधिकारी, कऱ्हाड 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT