सातारा

माशांचे गळ अन्‌ खाणाऱ्यांची चंगळ.!

अंकुश चव्हाण

कलेढोण (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यातील तलावांत यंदा मुबलक पाणीसाठा झाल्याने स्थानिक जातीतील माशांची मोठी पैदास झाली आहे. त्यामध्ये चिलापी मासे पकडण्यासाठी येरळवाडी प्रकल्पात तरुणाई तोबा गर्दी करून असते. तलावात व तलावातील सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्यात मासेमारी करणाऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. त्यात सांगली जिल्ह्यातूनही मासेमारीसाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. माशांचे गळ घेऊन येणाऱ्यांची मोठी चंगळ होताना दिसत आहे. 

येरळवाडी हा पाणीसाठ्याचा मध्यम प्रकल्प आहे. त्यात यंदा मुबलक पाणीसाठा होऊन येरळा नदी वाहू लागली आहे. त्यामुळे या नदीपात्रात व तलावात स्थानिक माशांची मोठी पैदास झाली आहे. त्यात चिलापीचे मोठे प्रमाण आहे. लॉकडाउनमध्ये घरी बसलेली तरुणाई हातात माशांचे गळ घेऊन तलावाकडे येऊन विरंगुळा म्हणून मासेमारीचा आनंद घेताना दिसत आहे. तलावात गळ व फेक जाळी टाकून दिवसाकाठी 50 ते 70 किलो मासे पकडताना दिसत आहेत. मासेमारी करण्यासाठी आलेल्या तरुणाईमुळे तलावावर तोबा गर्दी होत आहे. त्यासाठी मायणी, वडूज, अंबवडे, शिंदेवाडी, सूर्याचीवाडी, धोंडेवाडी, येरळवाडीसह सांगली जिल्ह्यातून तरुणाई दाखल होत आहे. तलावात सापडणाऱ्या माशांमुळे स्थानिक मच्छिमारांकडेही हॉटेल व्यावसायिक मोठी मागणी करत आहेत.

कायदा-सुव्यवस्थेसाठी आक्रमक भूमिका राहील : अजयकुमार बन्सल
 
यंदा मायणी, कानकात्रे, सूर्याचीवाडी, येरळवाडी या तलावांत मुबलक पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे नदी, ओढ्यातील स्थानिक माशांचे प्रजनन झाले असून, गावठी खेकड्यांची पैदासही होत आहे. कोरोनाकाळामध्ये मटण व चिकन दर वाढलेले असले तरी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता माशाला मोठी मागणी करत आहेत. येरळवाडीत तलावाच्या खाली सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्यात फेक जाळ्याने व गळाने मोठ्या प्रमाणात मासेमारी होत आहे. त्यासाठी फुटाफुटावर तरुण हातात गळ धरून उभा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माशांचे गळ अन्‌ खाणाऱ्यांची चंगळ.., असे चित्र दिसत आहे. 

एक तंगुस, चार गळ..! 
मुबलक सापडणाऱ्या माशांमुळे एका तंगुसाच्या काठीस चार-चार गळ लावून मासेमारी करण्याची नामी युक्ती शोधून मोठ्या प्रमाणात मासे पकडले जात आहेत. यावरून तलावात यंदा मोठ्या प्रमाणात माशांची पैदास झाल्याचे दिसून येत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT