Crowd of devotees at Shri Brahmachaitanya Maharaj Samadhi Temple gondavle satara
Crowd of devotees at Shri Brahmachaitanya Maharaj Samadhi Temple gondavle satara 
सातारा

Guru Purnima : श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात भक्तांची गर्दी

फिरोज तांबोळी

गोंदवले - रिमझिम पावसातही ओसंडून वाहणारा भक्तीचा महापूर आज गुरुपौर्णिमेदिवशी श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात पाहायला मिळाला. दोन वर्षापासून गुरुमाऊलीच्या भेटीसाठी आसुसलेले भाविक श्रींच्या पादुकांवर नतमस्तक होऊन धन्य पावले. मोठ्या भक्तीभावासह भावनिक सोहळा यानिमित्ताने उपस्थितांनी अनुभवला.

फुलांनी सजवलेली श्रींची समाधी... रांगोळ्यांनी सजलेले मंदिर...शांत वातावरणात अखंड पहाऱ्याच्या टाळाची किणकिण...मुखातून श्रीरामाचे अखंडित नाम...अशा मंगलमय वातावरणात श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात आज गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू होता.

श्री ब्रम्हचैतन्य महाराजांचे राज्य परराज्यात असंख्य अनुयायी आहेत. दर पौर्णिमेला भाविक श्रींच्या समाधी दर्शनासाठी येतातच,परंतु आज गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.परतणाऱ्या आषाढी वारीमुळेही भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.श्रींच्या समाधी मंदीरात गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटे पंचपदी भजनाने सुरुवात झाली. त्यानंतर अखंड नामस्मरण,भजन,श्री सद्गुरु लिलामृत पारायण आदी विविध धार्मिक कार्यक्रम आठवडाभर सुरु होते.हभप संदीपबुवा मांडके यांचेही कीर्तन झाले. आज पहाटे काकड आरतीने गुरुपौर्णिमेच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.

सकाळी मुख्य मंदीरात समाधी दर्शनाबरोबरच अनेक भाविक श्रींचा अनुग्रह घेत होते.तसेच अभिषेकासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी साडेआठच्या सुमारास रामदासी भिक्षेला सुरुवात करण्यात आली. श्रींच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी काल पासुनच हजेरी लावली होती. आज पहाटेपासुनच श्रींच्या समाधी दर्शनासाठी भाविकांच्या दुर अंतरापर्यंत लागलेल्या रांगा रिमझिम पावसातही शिस्तीनेच पुढे सरकत होत्या. समाधी मंदीराबरोबरच गावातील विविध मंदीरांमध्येही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

दरम्यान भाविकांच्या गर्दीबरोबरच वाहनांचीही आज मोठी गर्दी झाली होती. परंतु समाधी मंदिरालगतचा रस्ता आज दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने मंदिर परिसरात वाहतूक कोंडी झाली नाही.दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख व्यवस्था ठेवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT