Swara Taklela.
Swara Taklela. Sakal
सातारा

वडिलांचे छत्रानंतरही गुणांची शंभरी

सकाळ वृत्तसेवा

बिजवडी - दहिवडी (ता. माण) येथील रयत शिक्षण संस्थेचे परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी स्वरा दीपक टकले हिचे परीक्षाच्या तोंडावर असतानाचे वडिलांचे छत्र हरपले. वडील दीपक टकले यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही परिस्थितीशी धीराने सामोरे जात स्वराने जिद्दीने अभ्यास करून दहावीत १०० टक्के गुण मिळवले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करत त्यांना या निकालाची श्रद्धांजली वाहिली. या यशाबद्दल तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

दहिवडी येथील परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालयात पाचवीपासून शिक्षण घेणारी स्वरा हुशार व संस्कारशील मुलगी म्हणून ओळखली जाते. लहानपणापासूनच तिला शिक्षणाचे व संस्काराचे धडे घरातूनच वडील दीपक टकले व आई दिव्या टकले यांच्याकडून मिळाले. आईवडील दोघेही उच्चशिक्षित असल्याने ते कायमच आपल्या मुलीला ज्ञानाचे धडे देत.

वडिलांची लाडकी असलेल्या स्वराने दहावीत पैकीच्या पैकी गुण मिळवून आईवडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे तिच्या वडिलांचे स्वप्न होते. काही दिवसांवर बोर्डाची परीक्षा आल्याने स्वराने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईवडील व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. मात्र, त्यांच्या कुटुंबावर आघात करत तिच्या वडिलांना हिरावून नेले. त्या धक्क्यात कुटुंब सावरणे अवघड होते. स्वराची आई दिव्या यांनी मुलांकडे पाहात परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धाडसाने त्या उभ्या राहिल्या.

वडिलांची कमी भासू न देता काळजी घेत मुलीला वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वराने या धक्क्यातून सावरत अभ्यासाकडे लक्ष देत दहावीची परीक्षा दिली. परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून, स्वराने पैकीच्या पैकी गुण मिळवत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. हा निकाल वडिलांच्या चरणी अर्पण केला. निकालाची गोड बातमी ऐकताच आई दिव्या टकले यांच्या डोळ्यात एका बाजूला मुलीच्या यशाचे आनंदाश्रू, तर दुसऱ्या बाजूला पतीच्या निधनामुळे दुःखाश्रू दिसून येत होते. वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही त्यांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या स्वराच्या यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यालय, ग्रामस्थांतून अभिनंदन होत आहे.

परीक्षेच्या तोंडावर वडिलांचे निधन झाल्याने मोठा धक्का बसला होता. आता आमचे काय होणार? या विचाराने जिणे मुश्कील झाले होते. मात्र, आईने मोठ्या धाडसाने परिस्थितीचा सामना करत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचेय, असे सांगून ती कायम आधार देत होती. तिच्यामुळेच आज वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकले.

- स्वरा टकले, दहिवडी, ता. माण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT