स्ट्रॅाबेरीचं नुकसान sakal
सातारा

पावसामुळं महाबळेश्‍वरात ४५० हेक्टर स्ट्रॅाबेरीचं नुकसान

कृषी विभागाकडून नजर अंदाजे करण्यात आलेल्या पाहणीनुसार तीन तालुक्यांतील ४६० हेक्टर स्ट्रॅाबेरीचे नुकसान झाले आहे

- विकास जाधव

काशीळ : डिसेंबर महिन्याच्या सुरवातीस मॉन्सूनोत्तर झालेल्या पावसामुळे महाबळेश्वर, जावळी, वाई तालुक्यांतील स्ट्रॅाबेरी पिकांस फटका बसला आहे. कृषी विभागाकडून (Ministry of Agriculture) नजर अंदाजे करण्यात आलेल्या पाहणीनुसार तीन तालुक्यांतील ४६० हेक्टर स्ट्रॅाबेरीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ४५० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने येथील शेतकरी कोलमडल्याचे चित्र आहे.

राज्यासह देशात महाबळेश्वरच्‍या स्ट्रॅाबेरीचा गोडवा प्रसिद्ध आहे. थंड वातावरणामुळे येथील स्ट्रॅाबेरीची देशभर मागणी असते. मात्र, तीन वर्षांपासून स्ट्रॅाबेरी पिकांच्या मागे संकटाचे ग्रहण सुरू आहे. कोरोनाच्या काळात मातृरोपे उशिरा येणे, लॅाकडाउनमुळे विक्रीत अडचणी, पर्यटनस्थळे बंद असल्याने स्ट्रॅाबेरीचे अतोनात नुकसान झाले झाले. या संकटातून बाहेर पडत असतानाच या हंगामात स्ट्रॅाबेरीला चांगले दिवस येतील, या आशेवर शेतकऱ्यांनी भांडवली खर्च करत नव्या उमेदीने लागवड केली होती. पहिल्या टप्प्यात लागवड झालेली स्ट्रॅाबेरी सुरू झाली होती. मात्र, डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहात सलग चार दिवस झोडपून काढल्याने पहिला बहर वाया जाण्याबरोबर रोपांना मुळकुज लागली आहे.

शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने फळासह रोपेही खराब झाली आहे. नाताळ तसेच नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणीत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने हंगामातील सर्वाधिक दर या काळात मिळतो. मात्र, पावसामुळे स्ट्रॅाबेरीचा पहिला बहर जवळपास वाया गेल्याने डिसेंबरअखेरीस स्ट्रॅाबेरी विकण्यास मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना या चांगल्या दरापासून वंचित राहावे लागणार आहे. ज्या ठिकाणी रोपेच खराब झाली आहेत, अशा शेतकऱ्यांचा पूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती आहे. पहिला बहर तर जाणार आहेच. मात्र, पुढील बहर मिळून शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडावे, यासाठी स्ट्रॅाबेरी रोपे वाचवण्यावर कृषी विभागाकडून भर दिला जात आहे. स्ट्रॅाबेरीस बुरशी, मुळकुज प्रादुर्भाव वाढणार असल्याने ट्रॅायकोड्रामा, बॅसीलस सबटिलस ही बुरशीनाशके ५० गावांतील सुमारे ५०० ते ५५० शेतकऱ्यांना वाटप केले आहे. उर्वरित बाधित शेतकऱ्यांना वाटपाचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नुकसानीचा आकडा वाढणार

प्राथमिक नजर पाहणीत महाबळेश्वर तालुक्याचे ४५० हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. महाबळेश्वर, जावळी तालुक्यांत अनेक गावे, वाड्या-वस्त्या डोंगरात आहेत. या गावात स्ट्रॅाबेरी पीक घेतले जाते. अतिपावसामुळे प्रशासनास पोचता आलेले नाही. सर्व गावांतील प्रत्यक्ष पंचनामे झाल्यावर त्यामध्ये भर पडण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra government : 'देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?'; संजय राऊतांचा मोठा दावा

Nagpur: वाघाला पकडण्यासाठी दोघांचा थेट पिंजऱ्यात मुक्काम; कुही जवळील वेलतूरच्या जंगलात रंगला थरार

Latest Marathi News Live Update : लष्कर परिसरातील फलटण मशिदीसमोर १८ वर्षीय तरुणास पाच ते सहा जणांनी केली बेदम मारहाण

Panchgani Case : दारूच्या नशेत घरात डोकावला अन्...; इंदापूरच्या पर्यटकाचा पाचगणीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून; 4 जणांना 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

RSS Belagavi Meeting : 'आरएसएस'च्या बैठकीनंतरच साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटलं तोंड

SCROLL FOR NEXT