सातारा

बटाट्याच्या उत्पन्नात निम्म्याने घट, शेतकऱ्यांवर कोसळले आर्थिक संकट!

सलीम आत्तार

पुसेगाव (जि. सातारा) : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पुसेगाव परिसरातील बटाटा पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी बटाटा काढणीस प्रारंभ केला असला तरी बटाटा नासण्याचे प्रमाण अधिक असल्याने बटाटा उत्पादनात 60 ते 70 टक्के घट झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. 

पुसेगाव परिसरात सुरुवातीच्या काळात बटाटा, घेवडा, सोयाबीन व आल्याची मोठी लागवड करण्यात आली. खाऊ बटाट्याबरोबरच शेतकऱ्यांनी वेफर्ससाठी लागणाऱ्या एटीएल, 1533, एफसी-3 या बटाटा वाणांचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली. मध्यंतरी हवेतील अतिउष्णता व संध्याकाळच्या अतिपावसामुळे बटाटा मोठ्या प्रमाणात सडून गेला आहे. काढणीच्यावेळी जमिनीला वापसा नसल्याने बटाटा काढणीला विलंब होत आहे. सध्या पाऊस थांबल्यामुळे काही अंशी बटाटा पिकांची काढणी सुरू झाली आहे. परंतु, अतिपावसाचा फटका बसल्याने प्रतिक्विंटल 12 ते 15 क्विंटल एवढा उतारा अपेक्षित असताना केवळ पाच ते सहा क्विंटल एवढाच उतारा पडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने येथील शेतकऱ्यांनी बटाटा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. दोन क्विंटलपासून ते 200 क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे. बटाटा पिकासाठी बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी असा एकूण एकरी 60 ते 65 हजार रुपये खर्च होतो. यंदा पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी अडीच ते तीन महिन्यांपूर्वी बटाटा पिकाची लागवड केली होती. सुरवातीला पिकास पोषक वातावरण होते. मात्र, पीक पोसण्याच्या आणि काढणीच्या महत्त्वाच्या कालावधीत अतिपाऊस झाल्याने या पिकास मोठा फटका बसला आहे. बटाट्याबरोबरच आले पिकातही कंदकुजेचा मोठा प्रादुर्भाव होऊ लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. 

कोरोनामुळे वेफर्स कंपन्या अद्याप सुरू नसल्याने व्यापारी वेफर्सचा बटाटा खरेदी करण्यास तयार नाहीत. कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या सर्वत्र मजुरांचीही मोठी टंचाई भासत आहे. गेल्या आठवड्याप्रमाणे पुन्हा मोठा पाऊस झाला, तर बटाटा काढणीची कामे काही दिवसांसाठी ठप्प होतील. काढणीला आलेला बटाटा हा वेळेत काढला नाही तर बटाटा पिकास धोका निर्माण होऊन पीक हातचे जाण्याची भीती असल्याने शेतकरी व कुटुंबातील लोक वेळेत बटाटा काढण्यात मग्न आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: सुवर्णपदकाची हॅट्रीक थोडक्यात हुकली, तजिंदरपाल सिंग तूरने जिंकलं रौप्य; भारत मेडल्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

समृद्धीवर कारची कंटेनरला धडक, आई-वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू; पुण्याहून जालन्याला जाताना अपघात

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT