Mango Fruit  Mango Fruit
सातारा

ढेबेवाडीत अवकाळीच्या तडाख्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

हापूस, केशर, रत्ना यांसह रायवळ आंब्याने परिसरातील अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक हातभार दिला आहे.

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : दरवर्षी हापूस, केशरसह रायवळ आंब्याचे भरघोस उत्पादन घेणारे ढेबेवाडी खोऱ्यातील शेतकरी फळ गळतीमुळे चिंतेत आहेत. हवामानातील सततचे बदल आणि कडक ऊन, अवकाळी पाऊस यामुळे झाडांखाली कैऱ्यांचा सडाच पडत असल्याने आंबा उत्पादकांचे आर्थिक गणितच कोलमडण्याची भीती आहे.

पोषक हवामान व आंबा पिकास योग्य जमीन यामुळे ढेबेवाडी परिसरातील शेतकरी आंबा फळबाग लागवडीकडे वळले असून दरवर्षी लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढच होत आहे. डोंगरपट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मालकीच्या आंब्याच्या बागा असून सपाटीच्या गावांमध्येही फळबागा बहरल्या आहेत. पूर्वी डोंगरी भागात रस्ते व पाण्याची व्यवस्था नसतानासुद्धा शेतकऱ्यांनी डोक्‍यावरून घागरीने पाणी आणून बागा जगविल्या आहेत. बागेतील खत व पाणी व्यवस्थापनासह वणव्यांपासून झाडांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करतात.

हापूस, केशर, रत्ना यांसह रायवळ आंब्याने परिसरातील अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक हातभार दिला असून त्यांचे वार्षिक आर्थिक गणित याच हंगामावर अवलंबून असते. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या फळ गळतीमुळे हे गणित फिस्कटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. सुरवातीला धुके, ढगाळ वातावरण, गारपीट, पाऊस आणि त्यानंतर आता कडक ऊन व अवकाळी पाऊस यामुळे यंदा फळ गळती वाढली आहे. लहान व मोठ्या कैऱ्यांचा झाडांखाली अक्षरश: सडाच पडत आहे, असे काळगावचे फळबाग मालक राजू काळे व रुवलेतील रामचंद्र साळुंखे यांनी सांगितले.

प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात फळ गळती आम्ही पाहात आहे. आंब्याचे आगर असलेल्या ढेबेवाडी- काळगाव खोऱ्यात यंदा उत्पादनात जबर घट येण्याची भीती आहे.
राजू काळे, आंबा उत्पादक शेतकरी

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT