Strawberry Trees esakal
सातारा

तौक्ते वादळाचा स्ट्रॉबेरीला दणका; महाबळेश्‍वरात शेतकऱ्यांची स्वप्नं जमीनदोस्त

गेली दोन दिवस झालेल्या वादळी वारे आणि पावसाने महाबळेश्वर तालुक्‍यातील स्ट्रॉबेरीची झाडे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.

रविकांत बेलोशे

भिलार (सातारा) : गेली दोन दिवस झालेल्या वादळी वारे आणि पावसाने महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्‍यातील स्ट्रॉबेरी झाडे (Strawberry Trees) पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Damage To Strawberry Trees In Mahabaleshwar Due To Cyclone Tauktae)

अलीकडच्या काळात स्ट्रॉबेरी शेती ही स्पर्धा, अवेळी बदलणारे हवामान, कोरोना, बाजारपेठ अशा एक ना अनेक कारणांनी आतबट्ट्यात येऊ लागली आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून स्ट्रॉबेरी उत्तम पर्याय असल्याने शेतकरी हे पीक घेऊ लागले आहेत. परंतु, या वेळी स्ट्रॉबेरी उत्पादनात पुढे राहणार असे वाटतानाच तौक्ते वादळाच्या (Cyclone Tauktae) प्रभावामुळे सुरू असलेल्या जोरदार वादळी वारे व मुसळधार पावसामुळे स्ट्रॉबेरी पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील युवा शेतकरी श्रीकांत पवार यांनी स्ट्रॉबेरीची 20 गुंठे क्षेत्रात लागवड केली होती. परंतु, काही उत्पन्न घेतल्यावर मुख्य उत्पन्नाच्या वेळेसच वादळी वाऱ्याने पवार यांचे स्वप्न जमीनदोस्त केले आहे. त्यामुळे 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. स्ट्रॉबेरीप्रमाणेच स्ट्रॉबेरीचा समावेश पीक विम्यात केल्यास असे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानीपासून शेतकऱ्यांना हातभार लागण्यास मदत होणार असल्याचे शेतकरी पवार यांनी सांगितले.

Damage To Strawberry Trees In Mahabaleshwar Due To Cyclone Tauktae

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT