मोरगिरी (सातारा) : वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस Heavy Rain)... त्यामुळे तीन महिने जीव मुठीत घेऊन मोरणा विभागातील (Morna Area) कुटुंबे जगत आहेत. डोंगरातून (Mountain) कधी कडा कोसळेल, याचा नेम नाही. पावसाळा सुरू झाला की तेथील लोक रोज मरणचं घेऊन जगत असतात. प्रशासनाने दरडीची भीती असणाऱ्या डोंगराखालील गावांत पावसाळ्यापूर्वी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. (Danger Of Landslides In Morna Area Of Patan Taluka Satara Marathi News)
पाटण तालुक्यातील मोरणा विभागात अनेक गावे डोंगराच्या पायथ्याला वसली आहेत. डोंगराचा मोठा तीव्र उतार असलेल्या पायथ्याशी या गावात पावसात दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे.
पाटण तालुक्यातील मोरणा विभागात अनेक गावे डोंगराच्या पायथ्याला वसली आहेत. डोंगराचा मोठा तीव्र उतार असलेल्या पायथ्याशी असलेल्या या गावात पावसात दरडी कोसळण्याचा (Landslides) धोका कायम आहे. कुसरूंड येथील शिंदेवस्ती, मोरगिरी, किल्ले मोरगिरी, दिक्षी, गुरेघर, आंब्रुळे येथील ढोपरेवाडी, सोनवडे, शिंदेवाडी येथे डोंगरकडा कधी कोसळेल, याचा नेम नाही. त्यामुळे या गावांवर दरड कोसळण्याची टांगती तलवार कायम आहे.
पवनऊर्जा कंपन्यांनी पोखरलेले डोंगर, अमर्याद वृक्षतोड, कंपनीची वाहने जाण्यासाठी तयार केलेले रस्ते, मोठ्या प्रमाणात झालेले माती उत्खनन (Soil Excavation) यामुळे रहिवाशांच्या मनात कायमच भीतीचे ढग असतात. डोक्यावरचे छत कधी जाईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे पावसाळा जवळ येताच येथील लोकांच्या मनात भीतीचे काहुर माजते. पावसाळ्यात दररोज येथील लोकांना मरण घेऊनच जगावे लागते. आत्तापर्यंत मोठी दुर्घटना घडलेली नसली तरी ती होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने संबंधित गावांवरील संकटाच्या टांगत्या तलवारीचा सर्व्हे करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
सातत्याने होणारे भूकंप, मुसळधार पावसामुळे कधी कडा कोसळेल, याचा नेम नाही. पावसात कुटुंबाला घेऊन जाणार तरी कुठे? आमचे चांगल्या जागेत पुनर्वसन तरी करावे किंवा प्रशासनाने ठोस उपाययोजना करून दिलासा द्यावा.
-आनंदा जाधव, ग्रामस्थ, मोरगिरी
Danger Of Landslides In Morna Area Of Patan Taluka Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.