सातारा

नाले, चेंबरवरील जाळ्यांच्या दुर्दशेने धोका

सकाळवृत्तसेवा

सातारा : शहरातील नाले व चेंबरवरील संरक्षक लोखंडी जाळ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पादचारी व वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने चेंबरवरील जाळ्या नव्याने बसवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

शहरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी ठिकठिकाणी नाले व वाहिन्या आहेत. या नाल्यांवर संरक्षणासाठी बसविण्यात आलेल्या चेंबरच्या जाळ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे मुख्य चौक व वर्दळीच्या रस्त्यावर चेंबरची धोकादायक स्थिती झाल्याने पादचाऱ्यांना अपघात होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता आहे. शहरातील राजवाडा, जिल्हा परिषद चौक, कामाठीपुरा, बस स्थानक परिसर, गोडोली व इतर ठिकाणी जाळ्यांची दुरवस्था झालेली आहे. रस्त्याच्या समप्रमाणात जाळ्या न बसविल्याने वाहने आदळून लोखंडी जाळ्या तुटल्याचे दिसून येत आहे. या जाळ्यांमधील लोखंडी पट्ट्या व खिळे बाहेर आल्याने वाहनांच्या टायरला अपघात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या ठिकाणी नव्याने जाळ्या बसविणे आवश्‍यक आहे.

शहरातील पोवई नाका, कामाठीपुरा, राजवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संरक्षण जाळ्यांची दुरवस्था झाली आहे. कामाठीपुरा या ठिकाणी जाळी तुटल्याने काही दिवसांपूर्वी लहान मुलाचा पाय जाऊन अपघाताची घटना घडली होती. तसेच काही ठिकाणी चेंबर रस्त्याच्या मधोमध असून, वाहने सतत आदळत असल्याने चेंबरच्या जाळ्या चांगल्या प्रतीच्या आवश्‍यक आहेत. वर्दळीच्या रस्त्यावर चेंबर रस्त्याच्या समप्रमाणात घेऊन त्यावर सिमेंटची झाकणे बसविण्याची आवश्‍यकता आहे. वाहनचालक व पादचाऱ्यांचा धोका टाळण्यासाठी संबंधित विभागाने लवकरात-लवकर नव्याने जाळ्या बसविण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ नागरिक सतीश शिंदे यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

Maharashtra Ganesh Visarjan Live: पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप

डीपफेक फोटो प्रकरणी सीजेपीच्या दीपके, दास आणि रांका यांच्याकडे मागितले स्पष्टीकरण; दिल्ली उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT