सातारा

..अखेर शिपाई झाला मुख्याधिकारी; निवृत्तीचा दिवस ठरला अविस्मरणीय!

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याचा वरिष्ठ अधिकारी शाल, श्रीफळ, मानचिन्ह देवून सत्कार केला जातो. मात्र, पालिकेतील निवृत्त झालेले शिपाई दत्तात्रय गजरे यांचा पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आगळावेगळा सत्कार केला. श्री. गजरे यांना श्री. डाके यांनी मुख्याधिकारी यांच्या खुर्चीत बसण्याचा मान दिला. त्याशिवाय दुपापर्यंतचा कारभारही करण्याची संधी दिली. त्यामुळे 30 वर्षांपासून पालिकेत शिपाई म्हणून आदेशाचे पालन करणारे गजरे नोकरीच्या शेवटच्या दिवशी साहेबी थाटात निवृत्त झाले. त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. 

पालिकेचे शिपाई गजरे बुधवारी (ता. ३०) सेवानिवृत्त झाले. तब्बल 30 वर्षांपासून ते पालिकेत अविरत सेवा करत आहेत. शिपाई म्हणून काम करताना त्यांनी चांगले काम केल्याने पालिकेतील त्यांना सन्मान होता. बुधवारचा गजरे यांच्या निवृत्तीचा पालिकेतील शेवटचा दिवस होता. त्यामुळे श्री. गजरे यांच्यासाठी आजचा दिवस अविस्मरणीय होता. पालिकेत उद्यापासून आपण असणार नाही, या विचारानेच ते दिवसभर वावरत होते. अनेकांच्या त्यांनी भेटी घेऊन आभार मानले. 

मुख्याधिकारी डाके यांना भेटण्यासाठी ते आले. त्यावेळी गजरे यांना विलक्षण आनंद झाला. कारण, मुख्याधिकारी डाके यांनी श्री. गजरे यांचा वेगळ्याच थाटात केलेल्या सन्मानाने ते गहीवरून आले. ज्या खुर्चीत बसून पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी गजरे यांना कामाचे आदेश देत होते. सलग 30 वर्षांपासून त्या आदेशाप्रमाणे गजरेही काम करत होते. त्याच खुर्चीत बसण्याचा मान मुख्याधिकारी डाके यांनी गजरे यांना दिला होता. त्यामुळे गजरे यांचा बुधवारी मुख्याधिकारी डाके यांनी केलेला सत्कार त्यांच्यासाठी सर्वांगसुंदर, अविस्मरणीय असाच ठरला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : सावधान! पीडित महिलांचे AI व्हिडिओ व्हायरल कराल तर जेलमध्ये जाल; नाशिक एसआयटी चा इशारा

Latur News: ‘भाकरीच्या चंद्राला’आता महागाईचा डाग; ज्वारी ५५ ते ६० रुपये किलो, उत्पादन क्षेत्र घटल्याने हुरडा पार्ट्यांवरही परिणाम

Latest Marathi News Live Update : कोकणवासियांसाठी मनसे मैदानात

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Aadhaar App Preload : "ही जबरदस्ती कशासाठी?" नवीन मोबाईलमध्ये आधार ॲप सक्तीचे; पण ॲपल-सॅमसंगचा सरकारला विरोध का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT