Balasaheb Patil esakal
सातारा

सायरन वाजवत अचानक गाड्यांचा ताफा; सहकारमंत्री थेट समितीत..

हेमंत पवार

सायरन वाजवत अचानक गाड्यांचा ताफा आल्यानं ज्यांना या कार्यक्रमाची माहिती नव्हती, त्यांच्या भुवया उंचावल्या.

कऱ्हाड सातारा : शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कऱ्हाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीचं कार्यालय (Karad Executive Service Society Office) आहे. तिथं सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांचा सातारा जिल्हा बॅंकेत (Satara District Bank Election) ते संचालक झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सहकारमंत्री थेट बाजार समिती (Market Committee) आवारातच पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्यांच्या सत्काराचं कारण समजल्यावर अनेकांच्या उत्सुकतेचा फुगा फुटला.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकारमंत्री पाटील यांच्या विरोधात बाजार समितीची सत्ता ताब्यात असणारे माजी सहकरमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील यांनी निवडणूक लढवली. त्यामध्ये सहकारमंत्री पाटील हे आठ मतांनी विजयी झाले. त्यांच्या विजयाबद्दल आज कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समिती आवारात असणाऱ्या कऱ्हाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयात सहकारमंत्र्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मंत्री पाटील हे थेट बाजार समितीच्या आवारात पोहोचले.

Balasaheb Patil

सायरन वाजवत अचानक गाड्यांचा ताफा आल्याने ज्यांना या कार्यक्रमाची माहिती नव्हती, त्यांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी सहकारमंत्री थेट बाजार समितीतच जाणार अशा चर्चा सुरु केल्या. दरम्यान, फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले. काही वेळातच सहकरामंत्री पाटील हे बाजार समिती कार्यालय व्हाया कऱ्हाड सोसायटी कार्यालयात गेले. तेथे त्यांचा जयंत पाटील (Jayant Patil), रमेश सातुरे, चंद्रकांत हिंगमिरे, शिवाजी पवार, मोहसिन आंबेकरी, अख्तर अंबेकरी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT