Satara 
सातारा

विद्यार्थी रमले आनंददायी "टिली-मिली'त; पाठ सुरू होताच पाटी अन्‌ दप्तर घेऊन बसतात टीव्हीसमोर!

पांडुरंग बर्गे

कोरेगाव (जि. सातारा) : यंदा परीक्षा झाली नाही. अभ्यासासाठी कोणी कटकट मागे लावली नाही. चार महिने... हो..! चार महिने. सुटीच सुटी. पण, शाळा सुरू व्हायचे दिवसही संपून गेले. लोळायचे अन्‌ खेळायचे तरी किती. खेळून कंटाळलेल्या बालचमूंना शाळा, अभ्यासाची ओढ लागली असून, आता दूरदर्शनवर पाठ सुरू होताच बाल विद्यार्थी पाटी अन्‌ दप्तर घेऊन बसू लागले आहेत. आनंददायी शिक्षण देणाऱ्या "टिली-मिली' या अभ्यास मालिकेला विद्यार्थ्यांनी आपलेसे केले आहे. 

कोरोनाच्या संचारबंदीमुळे 22 मार्चपासून सर्व शाळा बंद आहेत. वार्षिक परीक्षाही झाल्या नाहीत. मुलांना यावर्षी सुटीच सुटी मिळाली. कधी नव्हे ते भरपूर खेळायला मिळाले. त्यांच्या खेळाला पालकही कधी कधी वैतागून जायचे. पालकांच्या दटावणीने काही अभ्यास केला असेल तेवढाच. नेहमीचा सुटीचा मे-जून संपला. मग, मात्र विद्यार्थ्यांना शाळा अन्‌ अभ्यासाची ओढ तीव्रतेने लागली असल्याचे जाणवू लागले आहे. 

दरम्यान, शाळा कधी सुरू होणार, हे आजही कोणी खात्रीने सांगू शकत नाही. त्यामुळे शाळांनी ऑनलाइन शिकवणे सुरू केले आहे. पण, चांगला मोबाईल आणि "रेंज'चा मोठा अडथळा येतो आहे. परंतु, सर्वच विद्यार्थ्यांना शिकता यावे, ऑनलाइन धडे मिळावेत, यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पहिली ते आठवी करिता सोमवारपासून (ता. 20) सुरू झालेल्या पाठांना दीर्घ सुटीला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. 

हे पाठ सकाळी साडेसातपासून दुपारी साडेबारापर्यंत वर्गनिहाय सुरू असतात. अभ्यासाची आस लागलेली मुले अक्षरशः पाठ सुरू व्हायच्या आधीच पाटी-दप्तर घेऊन दूरदर्शन संचापुढे बसलेली असतात. काही ठिकाणी तर शाळेचा गणवेश घालून बसलेली मुले आढळून येतात. मुलांचा हा उत्साह पाहून पालकांनी सुटकेचा सुस्कारा टाकला आहे. दूरदर्शनवरील पाठ पाहून मुले धडे गिरवू लागली आहेत. 


"टिली-मिली'अभ्यास मालिकेचे इयत्तानिहाय वेळापत्रक 

  • इयत्ता आठवी : सकाळी 7.30 ते 8
  • इयत्ता सातवी : सकाळी 8 ते 8.30 
  • इयत्ता सहावी : सकाळी 9 ते 9.30 
  • इयत्ता पाचवी : सकाळी 9.30 ते 10 
  • इयत्ता चौथी : सकाळी 10 ते 10.30 
  • इयत्ता तिसरी : सकाळी 10.30 ते 11
  • इयत्ता दुसरी : सकाळी  11.30 ते 12
  • इयत्ता पहिली : सकाळी 12. ते 12.30 
  • (रविवारी या आनंददायी शाळेस सुटी असेल) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT