Abaichiwadi Gram Panchayat  esakal
सातारा

Karad News : शॉक लागून ग्रामपंचायत शिपायाचा मृत्यू; लोकांना पिण्यासाठी पाणी सोडायला गेल्यानंतर दुर्घटना

आबईचीवाडी गावातील ग्रामपंचायतीमध्ये राजेंद्र जाधव हे शिपाई म्हणून काम करत होते.

हेमंत पवार

आज सकाळी ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेचे पाणी लोकांना पिण्यासाठी सुरू करून जात असताना त्यांना रस्त्यावर पडलेल्या प्रवाहित वीज तारेचा शॉक लागला.

कराड : कराड (जि. सातारा) तालुक्यातील आबईचीवाडी येथील ग्रामपंचायत (Abaichiwadi Gram Panchayat) शिपायाचा शॉक लागून मृत्यू (Electric Shock) झाल्याची घटना आज सकाळी घडली. राजेंद्र शंकर जाधव (वय 48) असे संबंधित मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, त्यांचे चुलत बंधू या दुर्घटनेतून दैव बलवत्तर म्हणूनच वाचले आहेत.

आबईचीवाडी गावातील ग्रामपंचायतीमध्ये राजेंद्र जाधव हे शिपाई म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे गावातील पाणीपुरवठा योजनेचे पाणी लोकांना पिण्यासाठी सोडण्याची जबाबदारी होती. आज सकाळी ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेचे पाणी लोकांना पिण्यासाठी सुरू करून शेतात जात असताना त्यांना रस्त्यावर पडलेल्या प्रवाहित वीज तारेचा शॉक लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, त्यांच्यासोबत असणारे त्यांचे चुलत भाऊ उत्तम दिनकर जाधव हे सुदैवाने त्या दुर्घटनेतून बचावले आहेत. राजेंद्र जाधव यांना शॉक लागल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याची माहिती गावातील उपसरपंच अशोक माने व कुटुंबीयांना दिली. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. राजेंद्र जाधव यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली असून महावितरणच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT