Grain Powder sakal
सातारा

Pesticide : धान्य कीटनाशक पावडर बेतली जीवावर! चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू

धान्य पावडरच्या उग्र वासाने घटना; परिसरात हळहळ

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : धान्याच्या पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्या दोन सख्या बहिण- भावाचा मृत्यू झाला. मुंढे (ता. कऱ्हाड) येथे ही हृदयद्रावक घटना घडली. त्याबाबत त्या चिमुकल्यांच्या नातेवाइकांनीच तशी माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. श्लोक अरविंद माळी (वय तीन) व तनिष्का अरविंद माळी (वय सात) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. सख्या बहिण- भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः धान्याची साठवणूक करताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्या दोघांनाही त्रास झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले आहे.

मुंढे येथील अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवत असताना त्यामध्ये पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरात येत असल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले आहे. उग्र वासामुळे श्लोक व तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला.

त्यामुळे काल (सोमवारी) प्रथम श्लोकला उलट्या व खोकल्याचा त्रास झाल्याने नातेवाइकांनी त्याला कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले. उपचार सुरू असतानाच सोमवारीच श्लोकचा मृत्यू झाला. आज त्याची मोठी सात वर्षांची बहीण तनिष्कालाही उलट्या व खोकल्याचा त्रास होऊ लागला.

त्यामुळे तिलाही नातेवाइकाने रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तिचाही सायंकाळी मृत्यू झाला. तीन वर्षाच्या श्लोकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर अतिरक्तस्रावामुळे व शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तनिष्काचे सायंकाळी शवविच्छेदन केले आहे. त्याचा अहवाल पोलिसांना अद्याप मिळाला नाही. तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेने मुंढेसह परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे. फौजदार प्रवीण जाधव तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT