RanjitSingh Naik-Nimbalkar esakal
सातारा

'अपात्र' यादीत असलेले भाजपचे खासदार-आमदार 'पात्र' ठरणार?

उमेश बांबरे

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदारयादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara District Bank Election) कच्च्या मतदार यादीवर दाखल झालेल्या आक्षेप हरकतींवरील सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत. आज मंगळवारी यावर विभागीय सहनिबंधक निर्णय देणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा संस्थेचे जिल्हा बॅंकेने अपात्र यादीमध्ये टाकलेले खासदार व आमदार यांचे ठराव पात्र होणार का, याची उत्सुकता लागली आहे, तसेच सोसायटी गटात मृत सभासदांच्या नावे असलेले ठराव पुन्हा नव्याने करावे लागणार आहेत.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदारयादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये १९६३ मतदारांची कच्ची यादी जिल्हा बॅंकेने तयार करून ती सहनिबंधक कार्यालयास पाठवली होती. ही यादी प्रसिद्ध करून त्यावर आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. कच्च्या यादीवर ४६ हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते पाणीपुरवठा संस्थेतील खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर (MP RanjitSingh Naik-Nimbalkar) व आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांच्या नावाचे ठराव जिल्हा बॅंकेने अपात्र यादीत टाकले होते. त्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली आहे. यावर विभागीय सहनिबंधक काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे, तसेच सोसायटी गटातून मृत सभासदांच्या नावे ठराव असल्याबद्दल १९, यादीत नाव नसल्याबद्दलचे पाच, राजीनामा दिलेला असल्याबद्दल दोन, ठराव केलेल्या प्रतिनिधींच्या नावासच हरकत असलेले ११, संस्थेची निवडणूक झाल्याबद्दलचा पाच आणि नावात दुरुस्तीसाठी चार आक्षेप दाखल होते.

यामध्ये सर्वाधिक २७ आक्षेप सोसायटी मतदारसंघातून झालेले आहेत, तसेच खरेदी- विक्री संघाबाबत एक, नागरी बॅंका व पतसंस्थांबाबत सात, गृहनिर्माणमधून सहा, औद्योगिक, विणकर, मजूर व पाणीपुरवठामधील पाच आक्षेपांचा समावेश आहे. मृत सभासदांची नावे यादीत असल्याबद्दल सर्वाधिक आक्षेप आलेले आहेत, या ठरावांची नावे बदलून देण्याची प्रक्रियाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत करता येणार आहे. काही ठिकाणी नावांबद्दल आक्षेप घेण्यात आलेला आहे. या सर्व आक्षेप, हरकतींवर सुनावणी झालेली आहे. त्यावर निर्णय देण्याचा कालावधी २२ सप्टेंबरपर्यंत आहे; पण सहनिबंधकांकडून येत्या सोमवारी व मंगळवारी निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे आता आक्षेप हरकतींवर काय निर्णय होणार याची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT