Jayakumar Gore
Jayakumar Gore esakal
सातारा

दम असेल तर गोरेंनी आमदारकी बाजूला सारून सामना करावा; देशमुखांचा थेट इशारा

संजय जगताप

'गोरेंनी दमदाटीची-दडपशाहीची भाषा करू नये, त्यांना आम्ही भीक घालणार नाही.'

मायणी (सातारा) : मायणी मेडिकल कॉलेजच्या (Mayani Medical College) संबंधाने डॉ. एम. आर. देशमुख आणि देशमुख परिवारावर आमदार गोरे यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. ही कोल्हेकुई म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. अनेक भानगडी करून कोणत्याही परिस्थितीत कॉलेज गिळंकृत करण्याचा त्यांचा कुटिल डाव आहे. मात्र, शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तो यशस्वी होऊ देणार नाही. दम असेल तर गोरेंनी आमदारकी व भाजपची (BJP) कमंडलू बाजूला सारून सामना करावा, असे प्रतिआव्हान मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्ष दीपक देशमुख (Deepak Deshmukh) यांनी आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांना दिले.

आमदार गोरे यांनी नुकतीच साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन मेडिकल कॉलेज व देशमुख कंपनीवर आरोपाच्या फैरी झाडल्या. त्या आरोपांचे पुराव्यानिशी खंडन करीत आज देशमुख यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला. केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि भाजपकडून सहानुभूती व पाठबळ मिळविण्यासाठीच, आपल्यावर गुन्हे दाखल करण्यामागे राष्ट्रवादीचेच षडयंत्र असल्याचा आरोप गोरे करीत असल्याचे स्पष्ट करून देशमुख म्हणाले, ‘‘आम्ही स्वबळावर लढत आहोत. कोणत्याही राजकीय पक्षांकडे गेलो नाही. मात्र, रामराजे नाईक निंबाळकर यांना नाहक या वादात ओढून घेत आहेत. कॉलेज फुकटात लाटण्याची दिवास्वप्ने बघणाऱ्या आमदार गोरेना डॉ. एम. आर. देशमुख (आबा) यांनी कधीही बोलावणे धाडले नाही.

संस्थेची मालमत्ता असलेले जमिनीचे गट नंबर ७६६ व ७६७, तसेच गट नंबर ६०६, ७७३, ७७४, ७६६अ, ७६७अ या सर्वांचे बिगर शेतीचे आदेश प्राप्त असताना संस्थेची जमीन एनए नसल्याचा बिनबुडाचा आरोप त्यांनी केला आहे. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये उपकरणे व मशिनरी उपलब्ध नाहीत म्हणणाऱ्या गोरे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी हॉस्पिटलचा करार केला. त्यामध्ये सर्व मशिनरी असल्याचे कसे काय नमूद केले आहे, याचा खुलासा करावा. त्यांनी केवळ दमदाटीची व दडपशाहीची भाषा करू नये, त्यांना आम्ही भीक घालणार नाही. त्यांनी ४० गुन्हे दाखल केले, तर आम्ही ४१ गुन्हे दाखल करू. तेवढे पुरावे आम्ही गोळा केले आहेत. योग्य वेळी ते बाहेर काढू.’’ पत्रकार परिषदेवेळी संचालक गणेश भिसे, संदीप देशमुख, हिम्मत देशमुख उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT