Mahesh Shinde
Mahesh Shinde esakal
सातारा

नगराध्यक्षपदासाठी बर्गेंचा एकमेव अर्ज; आमदार शिंदेंकडून शिक्कामोर्तब

राजेंद्र वाघ

नगरपंचायतीत १७ पैकी १३ सदस्य हे आमदार महेश शिंदेंच्या नेतृत्वाखालील कोरेगाव विकास आघाडीचे आहेत.

कोरेगाव (सातारा) : सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित असल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव विकास आघाडीकडून (Koregaon Vikas Aghadi) दीपाली महेश बर्गे (Deepali Barge) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचीच निवड निश्चित मानली जात आहे.

नगरपंचायतीमध्ये १७ पैकी १३ सदस्य हे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव विकास आघाडीचे आहेत. त्यामध्ये स्नेहल आवटे, साईप्रसाद बर्गे, वनमाला बर्गे, दीपाली बर्गे, सागर बर्गे, सागर वीरकर, राहुल बर्गे, अर्चना बर्गे, राजेंद्र वैराट, संगीता ओसवाल, परशुराम बर्गे, शीतल बर्गे, सुनील बर्गे यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली.

सकाळी आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्ड सदस्यांशी व त्यानंतर सर्व १३ नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी दीपाली बर्गे यांचे नाव निश्चित झाले. त्यानुसार मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्याकडे दीपाली बर्गे यांनी दोन उमेदवारी अर्ज सादर केले. त्यावर सूचक म्हणून अनुक्रमे शीतल बर्गे व राहुल बर्गे, तर अनुमोदक म्हणून अनुक्रमे परशुराम बर्गे व सागर वीरकर यांच्या सह्या असल्याची माहिती मुख्याधिकारी घाडगे यांनी दिली. याप्रसंगी डॉ. प्रिया शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे, माजी उपाध्यक्ष जयवंत पवार, सर्व नगरसेवक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

OYO IPO: लवकरच येणार ओयोचा आयपीओ; सेबीकडे पुन्हा कागदपत्र जमा करण्याच्या तयारीत

Virat Kohli on Chris Gayle : RCBमध्ये पुन्हा एकदा एंट्री करणार युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल? विराट कोहलीने दिली ऑफर

Healthy Diet For Kids : मुलांच्या निरोगी वाढीसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, मिळतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT