सातारा

'महावितरण'चा शेतकऱ्यांना जोर का झटका; ऐन ओलिताच्या हंगामात विजेचा लपंडाव

ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकरी व शेतमजुरांना ऐन ओलिताच्या हंगामात अनेक संकटांना समोर जावे लागत आहे. कडाक्‍याची थंडी पडत असल्यामुळे रात्रीचे ओलित करताना शेतकऱ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्‍यता अधिक आहे, तसेच जंगली जनावरे, विषारी साप, विंचू आदी प्राण्यांपासूनदेखील शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. 

सद्यःस्थितीत शेतीसाठी वीजपुरवठा करणारे वेळापत्रक आठवड्यातून चार दिवस रात्री 10:10 ते सकाळी 08:10 पर्यंत आणि तीन दिवस दिवसा सकाळी 09:05 ते सायंकाळी 05:05 पर्यंत असे आहे. अशा स्थितीमध्ये रात्रीचे ओलित करताना विस्कळित सुरळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री विजेची वाट पाहात ताटकळत बसावे लागते. त्यामुळे हे वेळापत्रक शेतकाऱ्यांकरिता गैरसोयीचे असून, त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर टाकणारे आहे.

रब्बी कांदा, बटाटा पिकाच्या लागणी झाल्याने या पिकांना पाणी देण्यासाठी नियमित व अखंड वीजपुरवठ्याची गरज आहे; परंतु विजेचा लंपडाव सुरू असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी पाणी असताना पिके सुकत असल्याचे पाहावे लागत आहे. परिणामी, या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन "महावितरण'ने शेतीसाठी वीजपुरवठा करणाऱ्या वेळापत्रकात योग्य तो बदल करून वीजपुरवठा दिवसा व अखंडित द्यावा, अशी मागणी पुसेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT