सातारा

भरतगाववाडीत बिबट्याचे भय संपता संपेना; ग्रामस्थांतून बंदोबस्ताची मागणी

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : भरतगाववाडी (ता. सातारा) येथे गेले सहा महिन्यांपासून सुरू असलेला वावर अद्याप कायम आहे. बिबट्याचे भयदेखील संपता संपत नाही. या पार्श्वभूमीवर वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आता कॅमेरे लावले आहेत. 

परिसरातील भरतगाववाडी गावालगतच्या डोंगरक्षेत्र परिसरात गेले सहा महिन्यांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. गेल्या काही दिवसांत या बिबट्याने शिवारात असलेल्या वस्तीवरील पाळीव कुत्र्यांना आपले लक्ष्य बनविले आहे. अलीकडे पिकास पाणी देण्यासाठी जाणाऱ्या श्रीकांत मोहिते, प्रकाश पवार या शेतकऱ्यांना अगदी काही अंतरावरच बिबट्याचे दर्शन झाले. या वेळी बिबट्याने वस्तीवरील एक पाळीव कुत्रा तोंडात धरलेला होता. मात्र, प्रसंगावधान राखून या दोघांनी दुचाकीची हेडलाइट लावून हॉर्नचा मोठा आवाज केल्यामुळे बिबट्याने भक्ष्य सोडून तिथून पलायन केले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वन विभागास दिली. ग्रामपंचायतीमार्फतही निवेदन देण्यात आले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कुशल पावरा, भरतगाव विभागाचे वनरक्षक राज मोसलगी यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याच्या पावलांची पाहणी केली. घटनेनंतर परिसरात वन विभागाने दोन कॅमेरे लावले आहेत. या वेळी तंटामुक्ती गाव समितीचे माजी अध्यक्ष जयवंत बागल, प्रकाश पवार, श्रीकांत मोहिते, प्रसाद घाडगे, अक्षय घाडगे, अतुल पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शिवारात जाताना शेतकऱ्यांनी आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

ग्रामस्थांत संभ्रमाचे वातावरण 

अलीकडेच पुणे-बंगळूर महामार्गावर खिंडवाडी ते शेंद्रे या गावांदरम्यान अनोळखी वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कदाचित, त्याच बिबट्याचा वावर भरतगाववाडी परिसरात असण्याची शक्‍यता ग्रामस्थांतून व्यक्त होत होती. मात्र, संबंधित बिबट्याच्या मृत्यूनंतर पुन्हा शिवारात कुत्र्यावर हल्ल्याची घटना घडली. त्यामुळे अद्यापही बिबट्याचा वावर सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

SCROLL FOR NEXT