सातारा

सातारा-आसनगावला अतिक्रमणाचा विळखा, चर खोदून केली जातेय रस्त्याची अडवणूक

सकाळवृत्तसेवा

सातारा : सोनगाव व शहापूर या दरम्यान उरमोडी नदीवरील सातारा-आसनगाव रस्त्यावरील प्रस्तावित पुलास अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढून रस्ता पूर्ववत खुला करावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज उरमोडी, कुमठे उतार पूल समितीने तहसीलदरांना निवेदनाद्वारे केली आहे.
 
याबाबत सातारा-आसनगाव हा रस्ता पूर्वीचा जुना रस्ता असून, गाव नकाशामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यावर जनार्दन काशिनाथ माने यांनी अनधिकृत पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण करत रस्ताच बंद केला आहे, तसेच काही ठिकाणी चर खोदून रस्त्याची अडवणूक करून त्यांच्या सोयीनुसार दुसरा रस्ता तयार केला आहे. सातारा-आसनगाव रस्त्यावरील उरमोडी नदीवर साकव पूल मंजूर झाला आहे; परंतु या ठिकाणी झालेल्या अनधिकृत अतिक्रमणामुळे नियोजित पुलाचे काम रखडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी झालेली अतिक्रमणे लवकरात-लवकर काढावीत, अशीही मागणी समितीने निवेदनात केली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India China Trade : सहा वर्षांपासून बंद कुलूप अखेर उघडणार! भारत-चीन संबंधांना नवं वळण, गलवाननंतर पहिली मोठी हालचाल!

हमजा नाहीतर DHURANDHAR 2 चा खरा किंग आहे 'हा' अभिनेता, त्याने दाऊदला सुद्धा सोडलं नाही, 45 वर्ष केलं पाकिस्तानात राज

Rare Wildlife Ratnagiri : निसर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! सह्याद्रीच्या पायथ्याशी पहिल्यांदाच दिसला राज्यप्राणी 'शेकरू'; जोडीदाराचाही शोध सुरू

Sangamner Acid Attack: संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी; संगमनेर अ‍ॅसिड हल्ला प्रकरण, तपासासाठी दहा पथके तैनात!

Hingoli News: अवेळी पावसाने गहू काढणीला तडाखा; हार्वेस्टर अभावाने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT