Deorai herbal plant planting in satara gondawale initiative by Pune lawyer son sakal
सातारा

Satara News : वनौषधी देवराई प्रकल्पाची गोंदवल्यात रोवली मुहूर्तमेढ; वडिलांच्या स्मरणार्थ पुण्याच्या वकील पुत्राचा उपक्रम

वडिलांचा आयुर्वेदाचा वारसा जपण्याबरोबरच वनौषधी देवराई साकारण्यासाठी पुण्यातील वकिलांनी गोंदवल्यात पाहिले पाऊल

फिरोज तांबोळी

गोंदवले : वडिलांचा आयुर्वेदाचा वारसा जपण्याबरोबरच वनौषधी देवराई साकारण्यासाठी पुण्यातील वकिलांनी गोंदवल्यात पाहिले पाऊल उचलले आहे.श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जागेत फुलणारी ही पहिली देवराई जिल्ह्यासाठी आदर्श मॉडेल ठरणार आहे.

माण खटावच्या ग्रामीण भागात पस्तीस वर्षे आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णसेवा करणाऱ्या डॉ पुंडलिक धायतडक यांनी विविध तेरा देशात आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करून जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविला.त्यांचा आयुर्वेदाचा वारसा जपण्यासाठी पुणे येथील त्यांचे सुपुत्र ऍड जे पी धायतडक यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

या प्रयत्नांची  मुहूर्तमेढ गोंदवल्यात रोवून त्यांनी वनौषधी वनस्पतीची लागवड करण्यासाठी पाऊल उचलले आहे.येथील इंदिरानगर वसाहतीजवळील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर समितीच्या जागेत सुमारे सत्तर प्रकारच्या वनौषधी वनस्पतींच्या २०० हुन अधिक रोपांची लागवड आज करण्यात आली.

यावेळी श्री धायतडक यांच्यासह गोंदवल्याचे सरपंच जयप्रकाश कट्टे,ऍड आर एस खाडे, ऍड अभयसिह देशमुख,बाळासाहेब खाडे,हभप नारायण महाराज गंबरे,मेजर हणमंत देवकुळे,गणपत खाडे,तुकाराम खाडे,पै.शहाजी खाडे,प्रवीण भोसले,

गोरख वसव,दत्तात्रय यादव,यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी मंदिर समितीचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.या वनौषधी वनस्पतींची लागवड करून संगोपणाचीही जबाबदारी श्री धायतडक यांनी उचलली आहे.समाधी मंदिर समितीकडूनही सर्व मदत केली जाणार आहे.

श्री धायतडक म्हणाले,जुन्या वनौषधी वनस्पतींचे रक्षण व संरक्षण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत.या वनस्पतींचा उपयोग येथील भविकांसह ग्रामस्थांना नक्की होईल.म्हणून हो वनौषधी देवराई साकारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

  जयप्रकाश कट्टे म्हणाले,आरोग्यासाठी मोलाची असणारी वनौषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली असून त्यांची जोपासना करण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे.या कामी सर्वांनी सहकार्य करावे.

  नारायण गंबरे म्हणाले,रुग्णसेवेसाठी आयुर्वेदात वनौषधी खूप मोलाची असून गोंदवल्यात साकार होणाऱ्या वनौषधी प्रकल्पाची इतरांनीही प्रेरणा घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT