सातारा

होय! शिवेंद्रसिंहराजे मला भेटले, आमच्यात चर्चाही झाली : अजित पवार

Balkrishna Madhale

सातारा : भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आज (शुक्रवार) उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तळात चर्चा रंगली होती. परंतु, याबाबत माध्यमांना स्पष्ट प्रतिक्रिया देत अजित पवारांनी राजकीय चर्चा खोडून काढत साताऱ्यातील भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे विकास कामासाठी आले होते. त्यात काहीही काळबेरं नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 

साताऱ्यातील भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी अजित पवारांची पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात भेट घेतली होती. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. याबाबत अजित पवारांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवेंद्रसिंहराजे हे विकास कामासाठी भेटून गेले. या अशा भेटी होत राहतात. त्यामुळे असा काही अर्थ काढू नका. त्यात काहीही काळबेरं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वीही शिवेंद्रसिंहराजे आणि माझी भेट झाल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 10 ऑक्टोबरपासून 17 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीप्रमाणे मुसळधार पावसाची शक्यता होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. त्याशिवाय पुढील दोन दिवस अशाचप्रकारे पाऊस पडू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर NDRF च्या बोटी किंवा मदत कार्य पोहोचवणं हे काम सुरु असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT