सातारा

बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यस्मरण दिनी पाटणात एक लाख शिवसेना सदस्य नोंदणीचा निर्धार

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या 54 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेत मंत्री देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाटण विधानसभा मतदारसंघात एक लाख शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.  

सातारा जिल्ह्याकरिता तीन लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यातील एक लाख शिवसेना सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघात करण्याचे उद्दिष्ट होत. त्यानुसार आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व गृहराज्यमंत्री देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण मतदारसंघातील शिवसेना सदस्यांची नोंदणी केलेले 71 हजार अर्ज शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांच्याकडे गृहराज्यमंत्री देसाई व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. उर्वरित राहिलेले 29 हजार शिवसेना नोंदणी अर्ज एक महिन्याभरात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मुंबईकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT