Pusegaon Sevagiri Maharaj Yatra esakal
सातारा

Pusegaon Yatra : सेवागिरी महाराजांच्या रथावर तब्बल 75 लाखांची देणगी अर्पण; परदेशी चलनांचाही समावेश

सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाला येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत असल्याने देणगीतही वाढ होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर भक्तांनी भारतीय चलनातील रुपयांबरोबर परदेशी चलनही मोठ्या प्रमाणावर अर्पण केले.

पुसेगाव : येथील श्री सेवागिरी महाराजांच्या (Shri Sevagiri Maharaj Pusegaon) ७६ व्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या रथोत्सवात भाविकांनी ७४ लाख २५ हजार २५८ रुपये देणगी अर्पण केल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे (Devasthan Trust) अध्यक्ष रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांनी दिली.

दरवर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाला येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत असल्याने देणगीतही वाढ होत आहे. श्री सेवागिरींच्या रथदर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मंदिर परिसरात गर्दी केली होती. रथयात्रेस सकाळी १० वाजता मंदिरापासून प्रारंभ झाला. सातारा-पंढरपूर या मार्गाने (Satara-Pandharpur Route) मिरवणूक यात्रास्थळावर पोचली.

यात्रास्थळावरून मिरवणूक परतल्यानंतर ग्रामप्रदक्षिणा करून रात्री उशिरा मंदिरात परतली. ही रथ मिरवणूक सुमारे १२ तास सुरू होती. या कालावधीत भाविकांनी अर्पण केलेल्या ५००, २००, १००, ५०, २०, १० रुपयांच्या नोटांच्या माळांनी श्री सेवागिरी महाराजांचा संपूर्ण रथ शृंगारलेला होता.

रात्री ११ वाजता मंदिरासमोर रथावरून नोटांच्या माळा एकत्र करून समितीने रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेली. ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांच्या अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची सर्व रक्कम मोजली. रात्री साडेअकरा वाजता प्रत्यक्ष देणगीची रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले.

परदेशी चलनही..

श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर भक्तांनी भारतीय चलनातील रुपयांबरोबर परदेशी चलनही मोठ्या प्रमाणावर अर्पण केले. विविध देशांच्या चलनातील डॉलर, दिनार, पौंडचा देणगीमध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सेवागिरी महाराजांचा महिमा परदेशात पोचल्याचेच हे द्योतक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Hapus Mango Crisis : चक्रीवादळ ते अवकाळी पाऊस; जागतिक कीर्तीचा हापूस आंबा आता धोक्यात? वाचा सविस्तर रिपोर्ट

प्रेमासाठी धर्म बदलायला तयार होती नयनतारा, मग का नाही झालं प्रभुदेवाशी लग्न? 'त्या' अटींमुळे होत्याचं नव्हतं झालं

iPhone 17 मिळतोय निम्म्या किंमतीत! ४४ हजारात खरेदीसाठी रांगा; कुठे सुरुय ही अजब ऑफर? पाहा एका क्लिकवर

Solapur Hyderabad Flight : सोलापूरकरांसाठी गूड न्यूज! 17 एप्रिलपासून विमान प्रवासाचं गणित बदलणार; पहा नवीन वेळापत्रक

'कमळी' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री; म्युझिक टिचर बनून येतेय सगळ्यांना वेड लावणारी गायिका, चाहते खुश

SCROLL FOR NEXT