Heavy Rain in Dhebewadi esakal
सातारा

छातीशी बिलगलेला पोटचा गोळा सोपवताना, त्यांचा पाय घसरला तर?

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : जीव वाचविण्यासाठी गरजेचं साहित्य सोबत घेऊन चिखल तुडवत जेव्हा नदीकाठावर (Heavy Rain in Dhebewadi) आलो, तेव्हा छोट्या बाळांना घेऊन एवढ्या पुरातून नदी ओलांडण्याच्या कल्पनेनंच अंगावर काटा आला. मदतीला धावलेल्या लोकांच्या हातात छातीशी बिलगलेला पोटचा गोळा सोपवताना, त्यांचा पाय घसरला तर..? अशा एक ना अनेक शंकांनी पाय थरथरू लागले. जेव्हा चार-पाच जण बाळाला उंच उचलून मुंगीच्या पावलांनी नदीपात्रातून पुढे- पुढे सरकत होते तेव्हा तर काळजाचा ठोकाच चुकला अन् काही मिनिटांसाठी गच्च झाकून घेतलेलं डोळं बाळ काठावर पोचल्यानंतरच उघडलं... डोंगराला भेगा पडल्याने धनावडेवाडी-शिंदेवाडीतून ढेबेवाडीत (Dhebewadi Landslide) आश्रयाला येताना तेजश्री संदीप शिंदे (Tejashree Shinde) यांच्यासह सोबतच्या इतरही बाळांच्या आईंना भरलेलं नदीपात्र ओलांडताना झालेली मनाची प्रचंड घालमेल सांगताना आज अश्रू अनावर झाले. (Dhebewadi Rain Tejashree Shinde From Dhebewadi Landslide Shared A Thrilling Experience bam92)

धनावडेवाडी-शिंदेवाडी ढेबेवाडीत ३२ कुटुंबांतील ८५ जणांनी काल आपले गाव सोडून ढेबेवाडीत आश्रय घेतला आहे. त्यामध्ये ३५ महिला, २५ लहान मुले व २५ पुरुषांचा समावेश आहे.

धनावडेवाडी- शिंदेवाडी येथील ३२ कुटुंबांतील ८५ जणांनी काल आपले गाव सोडून ढेबेवाडीत आश्रय घेतला आहे. त्यामध्ये ३५ महिला, २५ लहान मुले व २५ पुरुषांचा समावेश आहे. येथील साई मंगलम कार्यालयात त्या सर्वांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आज तेथे भेट दिली असता पोलिस व महसूल प्रशासन, तसेच ग्रामस्थ, शिक्षकांच्या मदतीने चिमुकल्यांना घेऊन वांग नदी ओलांडतानाचा थरारक प्रसंग सांगताना अनेक महिलांचे डोळे पाण्याने डबडबले. यातील अवघ्या सहा महिन्यांच्या विधी या चिमुकलीची आई तेजश्री शिंदे यांच्यासह अनिता सावंत, सीमा पवार म्हणाल्या, ‘‘गाव व परिसरात दरडी कोसळत असताना आम्ही सर्वांनी मुलाबाळांसह तेथीलच मंदिरात आश्रय घेतला होता. फक्त जेवणासाठीच लोक घरी जात होते.

Dhebewadi Rain

गावाजवळचा पूल तुटल्याने ठप्प झालेले दळणवळण आणि नॉट रिचेबल मोबाईल अशा परिस्थितीत चार दिवस काढल्यानंतर जेव्हा गावाबाहेर पडण्यासाठी नदीकाठावर आलो तेव्हा शिड्यावरून पोटच्या गोळ्यांना पुलावर नेताना आणि तेथून खाली उतरून पुन्हा नदी ओलांडताना भीतीनं काळजाचं पाणी- पाणी झालं. अनेक शंकांनी मनाला घेरलं होत. नदी पात्राकडे बघायची हिंमत होत नव्हती. डोळे गच्च झाकून घेतलं होतं. जेव्हा त्या सर्वांनी चिमुकल्यांना सुरक्षितपणे नदीपलीकडे नेले तेव्हाच आमच्या जीवात जीव आला.’’

Dhebewadi Rain Tejashree Shinde From Dhebewadi Landslide Shared A Thrilling Experience bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT