Jayant Patil esakal
सातारा

'..तर जयंत पाटील, शशिकांत शिंदेंना रस्त्यावर फिरू देणार नाही'

आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : जिहे-कठापूर पाणी उपसा सिंचन योजनेच्या (Jihe-Kathapur Water Irrigation Scheme) पाण्याबाबत खटाव तालुक्यातील (Khatav Taluka) पूर्व भागाशी सापत्न भूमिका घेतल्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) व आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांना तालुक्यातील जनता रस्त्यावरून फिरू देणार नाही, असा इशारा माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर (Dr. Dilip Yelgaonkar) यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. डॉ. येळगावकर म्हणाले, ''जिहे-कठापूर योजना ही निवृत्त अभियंता मंडळाने तयार केलेली आहे. माजी आमदार (कै.) कॅ. आर. डी. निकम यांनी माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून ही योजना तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांच्यापर्यंत पोचवली होती. १९९५ मध्‍ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचे शासन आल्यानंतर या योजनेला खरी गती आली आहे. (Dilip Yelgaonkar Warns Minister Jayant Patil And MLA Shashikant Shinde On Jhee-Kathapur Scheme bam92)

आपण स्वत: आमदार असताना विधानसभा पायरीवर अधिवेशन काळात उपोषण केले. त्याची गांभीर्याने दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन संपल्यानंतर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.

निधीअभावी काम रखडलं

तत्कालीन पाटबंधारेमंत्री महादेव शिवणकर, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, मंत्री एकनाथ खडसे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष उदयनराजे भोसले, सदस्य गिरीष बापट यांच्यामार्फत आपण स्वत: पाठपुरावा केला आहे. त्यानंतर या योजनेला ११ फेब्रुवारी १९९७ रोजी प्रशासकीय मान्यता मिळून २६ हजार ९०७ कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही झाली. त्यानंतर निधीअभावी काही दिवस हे काम रखडले.

नितीन गडकरींच्या माध्यमातून ३० कोटींचा निधी

आपण स्वत: आमदार असताना विधानसभा पायरीवर अधिवेशन काळात उपोषण केले. त्याची गांभीर्याने दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन संपल्यानंतर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे त्यांच्या व आपल्या स्वत:च्या उपस्थितीत कामही सुरू झाले. योजनेच्या अर्धवट पाइपलाइन व इतर कामासाठी आपल्या मागणीखातर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. योजना अनेक वर्षे लांबल्यामुळे योजनेचा खर्च वाढत गेला.’’

Dilip Yelgaonkar Warns Minister Jayant Patil And MLA Shashikant Shinde On Jhee-Kathapur Scheme bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT