सातारा

जिल्हा बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना 'विमा कवच'; व्यवस्थापनाचा ऐतिहासिक निर्णय

उमेश बांबरे

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सध्याच्या धकाधकीच्या आणि कोरोना संसर्गाच्या वातावरणात कर्मचारी सुरक्षा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्याच्यादृष्टीने बॅंकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना जीवन विमा संरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे प्रतिपादन बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

कर्मचारी आयुर्विमा संरक्षण योजनेचा प्रारंभ बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांच्या हस्ते भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बॅंकेच्या सेवक कल्याण निधीमधून विमा प्रिमियम 83.83 लाख रुपयांचा धनादेश देऊन करण्यात आला. सध्या कोरोनाच्या काळात नोटा, इतर कागदपत्रांची देवाण-घेवाण, ग्राहकांशी संपर्कामुळे बॅंकेचे बरेच कर्मचारी कोरोनाबाधित होऊन त्यांची जोखीम वाढली आहे. त्यामुळे बॅंकेच्या संचालक मंडळाने कर्मचारी हिताचा हा निर्णय घेतल्याचे बॅंकेचे उपाध्यक्ष श्री. माने यांनी सांगितले. 

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सातारा विभागाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक ललितकुमार वर्मा म्हणाले, "सातारा जिल्हा बॅंकेने कर्मचारी हित डोळ्यासमोर ठेवून राबविलेल्या विमा योजना प्रशंसनीय असून, बॅंकेने भविष्याचा वेध घेत उचललेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल सहकारी बॅंकिंग क्षेत्राला दिशादर्शक आहे. ''या पॉलिसी अंतर्गत कर्मचाऱ्यांना यापूर्वी असलेल्या विमा संरक्षणाव्यतिरिक्त अधिकचे दहा लाखांपर्यंत जीवन विमा संरक्षण प्राप्त होणार आहे. 

बॅंक कर्मचाऱ्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास एकत्रित 33 लाख रुपयांपर्यंत आणि अपघाती मृत्यू झाल्यास एकत्रित 69 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत वारसाला प्राप्त होणार आहे, अशी माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली. याप्रसंगी बॅंकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, बिगरशेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक वाय. जे. साळुंखे, उपव्यवस्थापक महेश शिंदे, एलआयसी पेन्शन व समूह विमा सातारा शाखेचे व्यवस्थापक संतोष गायकवाड, उपव्यवस्थापक प्रदीप शिंगटे, बॅंकेचे अधिकारी, सेवक उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT