सातारा

शेतकरी सुखावला! लक्ष्मीपुजनाच्या दिवशी साता-यात झेंडूच्या फुलांचा दर वधारणार

गिरीश चव्हाण

सातारा : अवकाळी पावसाचा फटका बसल्याने दसऱ्या पाठोपाठ दिवाळीत झेंडुच्या फुलांचे दर भडकले आहेत. शुक्रवारी साताऱ्यात झेंडुच्या फुलांना प्रतिकिलो दोनशे रुपयांचा दर आला होता. हा दर लक्ष्मीपुजनाच्या दिवशी दुप्पट होण्याची शक्‍यता फुलविक्रेत्यांनी वर्तवली आहे. 

दसऱ्याची बाजारपेठ नजरेसमोर ठेवत अनेक शेतकऱ्यांनी झेंडुची लागण केली होती. झेंडुच्या फुलांचा बहर जोमात येत असतानाच जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. या पावसामुळे झेंडुच्या बागांसह इतर सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे दसऱ्याच्या आदल्या दिवशी झेंडुच्या फुलांचा दर 100 ते 150 किलो दरम्यान जावून पोहोचला होता. दसऱ्या दिवशी फुलांना 400 रूपये इतका विक्रमी दर साताऱ्यात मिळाला. दसऱ्यानंतर फुलांना लक्ष्मीपुजनादिवशी मोठी मागणी असते.

प्राथमिक शिक्षकांचे दातृत्व, आरोग्य केंद्रांना श्वास देऊन सिध्द केले कर्तृत्व 

आज (शुक्रवार) साताऱ्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडुची फुले विक्रीसाठी आणली होती. सकाळच्या टप्प्यात फुलांचा दर प्रतिकिलो 200 रूपये किलोच्या घरात होता. फुलांची प्रत आणि आकारानुसार दरात फरक होता. लक्ष्मीपुजनादिवशी फुलांचा दर 400 ते 500 रुपयांच्या घरात पोचेल, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्‍त केला. झेंडुच्या फुलांचे दर चढल्याने त्याचा परिणाम हाराच्या किंमतीवर सुध्दा झाल्याचे दिसून आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

जीवन संपवण्याच्या काही तासांपूर्वी नाचत-गात होती प्रसिद्ध अभिनेत्री; पण नंतर घडलं भयंकर, संचिता उगलेनं टोकाचा निर्णय का घेतला?

गुंगीचं औषध देत अत्याचार, नंतर व्हिडिओ काढला अन्...; वर्गमित्राने तरुणीचा घात केला, भयंकर घटनेतील मौलवी फरार

Latest Marathi News Live Update : नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

भर गर्दीत रश्मिकाने घेतली विजयची खास काळजी; viral video पाहून नेटकरी म्हणाले, ‘अशी बायको सगळ्यांनाच मिळो!’

SCROLL FOR NEXT