सातारा

Diwali Festival 2020 पुणेकरांनी जपली सामाजिक बांधिलकी, गरीब-गरजूंची दिवाळी केली 'गोड'

अंकुश चव्हाण

कलेढोण (जि. सातारा) : कोरोनाच्या काळात ज्या कुटुंबांच्या घरी दु:खद घटना घडली व गरीब गरजू 110 कुटुंबांना पुणेस्थित कलेढोणकरांनी फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. या उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून, त्यामुळे मनस्वी आनंद वाटत असल्याचे पुणेस्थित कलेढोणकरांनी सांगितले. 

पुणे येथे व्यवसाय, नोकरीनिमित्ताने स्थायिक झालेले कलेढोणकर नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. गावात दुष्काळात टॅंकरने पाणीपुरवठा करणे, पाणी फाउंडेशनला आर्थिक मदत, भवानी मंदिर परिसरात वृक्षारोपण, गावातील ओढा रुंदीकरण व बंधारा बांधणीत आर्थिक मदत यासारखी समाजोपयोगी कामे करण्यात पुणेस्थित कलेढोणकर पुढे असतात, तर दिवाळीत दरवर्षी ज्या कुटुंबात दुखःद घटना घडली आहे, त्या कुटुंबात दिवाळी केली जात नाही, तसेच गरीब कुटुंबांना दिवाळीचे वाटप करण्यात येते. 

या वर्षी या उपक्रमाचे सातवे वर्षे असून, 110 कुटुंबांना लाडू व चिवडा वाटप करण्यात आले. गावातील हनुमान मंदिरात व गरिबांना घरी जाऊन वाटप करण्यात आले. फराळाचे वाटप करून पुणेकरांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यावर्षी कोरोनाच्या महामारीत गावातील अनेक कुटुंबांतील सदस्य दगावले आहेत. अशा कुटुंबांची विचारपूस करीत दिवाळीच्या फराळाच्या वाटप करण्यात आले. दरम्यान, दर वर्षी पुणेस्थित कलेढोणकर गावच्या विकासकामात सहभागी होतात. नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेर असले, तरी गावाशी असलेली त्याची नाळ भक्कम आहे. पुणेस्थित कलेढोणकरांनी केलेल्या मदत ही लाखमोलाची ठरली आहे, असे ज्येष्ठ नागरिक मालोजीराव कुंभार यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

Renuka Shahane : 'मराठी लोकांना कमी लेखणाऱ्यांना मत देऊ नका'; त्या घटनेनंतर रेणुका यांनी व्यक्त केला संताप

मराठा समाजातील NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणबी आरक्षण न मिळाल्याने एकाने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT