सातारा

Diwali Festival 2020 : दीपावलीत मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम

Balkrishna Madhale

सातारा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची दीपावली फटाकेमुक्त साजरी करावी, खरेदीसाठी जाताना गर्दी करू नये, दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हावासियांना केले आहे. युरोपातील विविध देशांत, तसेच दिल्लीत रूग्णांची वाढती संख्या पाहता मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर केला तरच आपण दुस-या लाटेतील रूग्णसंख्या थोपवू शकतो, असे सांगत त्यांनी जिल्हावासियांशी संवाद साधला. 

दीपावली सणाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये गर्दी, तसेच लोकही एकमेकांना भेटणार आहेत. मात्र, कोरोना प्रादुर्भाव वाढू न देण्यासाठी मास्कचा वापर आवश्यक आहे. यासाठी दीपावलीच्या आठवड्यात मास्क न वापरणारांवर कारवाई करण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात येणार आहे. 500 रुपये दंड करण्यात येणार आहे. दुकानांत सोशल डिस्टन्स न पाळला गेल्यास दंड आणि दुकान बंद ठेवण्याची तरतूदही करण्यात आली आहे. ही कारवाईही वाढवण्यात येणार असल्याची माहिती सिंह यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे दिली आहे.  

जगभरात तसेच दिल्लीत दुस-या लाटेत रूग्णसंख्या वाढत आहे. दिल्लीत पूर्वी दिवसाला 4 ते 4500 रूग्ण सापडत होते. ते आता दिवसांत 7 ते 7500 सापडत आहेत. कोरोनाची रूग्णसंख्या वाढू द्यायची नसेल तर मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे, अन्यथा सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात वाढलेली रूग्णसंख्या व निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा ओढवू शकते, असा इशाराही जिल्हाधिकारी सिंह यांनी जिल्हावासियांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

Heart Attack Prevention : वयाच्या तिशीतच का येतोय हार्ट अटॅक? तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका; 'या' सवयी तातडीने बदला नाहीतर...

SCROLL FOR NEXT