सातारा

Diwali Festival 2020 : ''लक्ष्मी' आली नवा साज लेवून! केरसुण्यांना महिलांची पसंती

सिद्धार्थ लाटकर

सातारा : घरात मानाचे स्थान असणारी, दिवाळीत पूजनासाठी आवर्जून हवी असते ती "लक्ष्मी' नवा साज लेवून दाखल झाली असून, केरसुण्या आता प्लॅस्टिक आणि नक्षीच्या मुठीसह बाजारात आल्या आहेत, तसेच दिवाळीच्या आनंदाला तेजाची जोड देण्यासाठी लागणाऱ्या पणत्या, लामणदिव्यांना या वर्षी कलाकारांनी सुंदर रंगसंगती आणि नक्षीची जोड दिली असून, किंमत किंचित जास्त असली, तरी नागरिक नक्षीच्या पणत्यांना पसंती देत आहेत.
 
दीपानी दिपल्या दिशा... ही उक्ती खरी करण्यासाठी अन्‌ समस्त नागरिकांचे अंगण मिणमिणत्या प्रकाशाने प्रकाशित करण्यासाठी दिवाळीच्या सणात मोठे मानाचे स्थान असणाऱ्या पणत्या बाजारपेठेत ढिगाने दाखल झाल्या असून, विविध आकारांतील आणि रंगातील पणत्या विक्रीच्या स्टॉलवर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. पूर्वी कुंभार कलाकार गाळाच्या मातीच्या खापरी पणत्या देत असत. आता खापरी पणत्या बाजारात दिसत नाहीत. त्याची जागा तांबड्या रंगातील राजस्थानी पणत्यांनी घेतली आहे. राजवाडा परिसर, मोती चौक, कर्मवीर भाऊराव पाटील पथाबरोबरच पोवई नाका, बस स्थानक परिसरातही रस्त्याच्या कडेला बसून विक्रेते पणत्याची विक्री करत आहेत. या पणत्यात आता विविधता आली आहे. पाच, सात ज्योतीच्या पणत्या, फुलांच्या आकाराच्या, दीपमाळा आणि कमळाच्या आकारातील पणत्याही सध्या बाजारात आहेत. आकर्षक रंग, आकर्षक डिझाईनमुळे लोकांना चिनीमातीच्या पणत्या जास्त भावतात.

कोरोनाजन्य आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षकांचे भरीव काम : अविनाश फडतरे
 
लक्ष्मीपूजनासाठी केरसुणी हवीच असते. आजवर या केरसुण्यांची मूठ साधीच असायची. मात्र, माण, खटावमधील कलाकारांनी केरसुण्या विक्रीस आणल्या असून, आता केरसुण्यांनाही प्लॅस्टिकच्या मुठी बसविल्या आहेत. यामुळे केरसुणीच्या बांधणीला कडकपणा आला असून, हातात धरण्यासही सुलभ झाल्या आहेत. महिला या केरसुण्यांना पसंती देऊ लागल्या आहेत. त्यांच्या किमती साधारण 40 ते 80 रुपयास एक आहे.

महागाईमुळे दिवाळी कडूच; किराणा मालात दहा टक्‍क्‍यांनी वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT