सातारा

शिरसवडी- होळीचेगाव फाट्याजवळ डॉक्‍टरास मृत्यूने कवटाळले

शशिकांत धुमाळ

निमसोड (जि. सातारा) : निमसोड (ता. खटाव) येथील डॉ. ज्ञानेश्वर रामचंद्र घाडगे (वय 54 ) यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून व अपघात स्थळावरून दिलेली माहिती अशी, की सोमवारी (ता. 1) सकाळी साडेनऊच्या सुमारास निमसोड येथील डॉ. ज्ञानेश्वर घाडगे हे गावी जाताना शिरसवडी- होळीचेगाव फाट्याजवळ गाडी (एमएच 12 एफबी 6491) या गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्यालगत असणाऱ्या नाल्यात जाऊन जोरदार आदळली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

अपघातस्थळावर तातडीने वडूज पोलिस ठाण्याचे कर्मचारी हजर राहिले. डॉ. घाडगे यांना वडूज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत झाल्याचे घोषित केले. डॉ. घाडगे यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास हवलदार शांतीलाल ओंबासे करीत आहेत.

मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही हेच पालिकेत आहे सुरु

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

Job: एक लाख पगार, काम फक्त खायचं; वजन वाढलं तरी फायदाच! कुठे आहे ही नोकरी?

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT