Accident
Accident Sakal
सातारा

चारचाकी झाडावर आदळून डॉक्टरचा जागीच मृत्यू

आयाज मुल्ला

चारचाकी ओढ्यातील झाडावर आदळून डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला.

वडूज / मायणी - चारचाकी ओढ्यातील झाडावर आदळून डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मिरज- भिगवन राज्यमार्गावर खटाव तालुक्यातील धोंडेवाडी गावच्या हद्दीत घडला. डॉ. प्रसन्न किशोर भंडारे (वय ३५, रा,वडूज) असे अपघातातील मृताचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळ व नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. प्रसन्न हे मायणी येथील रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल या मेडीकल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत होते. आज सकाळी मायणीहून परत वडूजला येताना धोंडेवाडी गावच्या हद्दीत विठ्ठल थोरात यांच्या मालकीच्या शेतानजिक असणाऱ्या माईन वाट परिसरातील एका ओढ्यात डॉ. भंडारे यांची चारचाकी (वाहन क्रमांक एम.एच. ११ बी.व्ही. ९०७४) गेली. ओढ्याला लागूनच असलेल्या एका बाभळीच्या झाडावर जोरात आदळली. त्यामध्ये चारचाकी वाहनाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला.

अपघातात डॉ. भंडारे यांच्या छाती, बरगड्या व हृदयाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या आवाजाने नजिकच्या काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन ओढ्यातील बाभळीच्या झाडावर आदळून पलटी झालेली चारचाकी पुन्हा उभी करून डॉ. भंडारे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्यासमवेत असणाऱ्या आधारकार्डवरील पत्त्यामुळे नागरिकांनी येथे संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.

घटनास्थळी मेडिकल कॉलेजचे पदाधिकारी, कर्मचारी पोलीस व नागरिकांनी धाव घेतली. मृत डॉ. प्रसन्न हे येथील प्रख्यात आयुर्वेदतज्ञ व माऊली आयुर्वेद व पंचकर्म सेंटरचे संचालक डॉ. किशोर भंडारे यांचे चिरंजीव आहेत. डॉ. प्रसन्न यांनी आयुर्वेदातील एम.डी.चे शिक्षण पूर्ण केले असून ते वैद्यकीय व्यवसायाबरोबरच मायणी येथे आयुर्वेद महाविद्यालयात अध्यापनास जात होते. ते वडूज मेडीकल असोसिएशन व निमा या वैद्यकीय संस्थांचे सक्रीय सदस्य होते. त्यांच्या मागे आई, वडील, एक बंधू, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. डॉ. प्रसन्न यांचे येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी शोकाकूल वातावणात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. प्रसन्न यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मायणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

अपघाताची भिषणता..

चारचाकीच्या धडकेने बाभळीच्या झाडातील बुंध्यातील आतील भाग मोठ्या प्रमाणावर उघडा पडला होता. तर झाडावरील एक फांदीही तुटली होती. चारचाकीचा पुढील, मागील भाग, इंजिन, चाके, टफ, दरवाजे अश्या सर्वच भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे अपघाताची भिषणता जाणवत होती.

संरक्षक कठड्यांचा मुद्दा ऐरणीवर

अपघात घडलेल्या ठिकाणी ओढ्याच्या दोन्ही बाजूंचे संरक्षक दगडी कठडे पूर्णत: उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे त्याठिकाणी वाहनाला अपघात झाल्यास कोणत्याही बचावाची संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. आजची अपघातग्रस्त चारचाकी देखील ओढ्यावरील रस्त्याला संरक्षक कठडे नसल्याने थेट बाभळीच्या झाडावर आदळल्याचे नागरिकांनी सांगितले. या मार्गावरील अनेक ठिकाणी असणाऱ्या ओढ्यांवर संरक्षक कठडेच नाहीत त्यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Updates : 'त्या' अल्पवयीन आरोपीचा अपघातापूर्वीचा पबमधला व्हिडीओ आला समोर; पब चालकासह इतरांवर गुन्हे दाखल

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Pune Accident News: पुण्यातील हिट अँण्ड रनप्रकरणी पोलिसाचं निलंबन? गृहमंत्र्याचे कठोर कारवाईचे आदेश; हे आहे कारण

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT