sugarcane sakal
सातारा

कुणी ऊसतोड टोळी देता का टोळी...

पुसेगाव-बुध परिसरात उसाला मिळेना तोड; शेतकरी वर्गात अस्वस्थता

सकाळ वृत्तसेवा

विसापूर : पुसेगाव-बुध परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर ऊसतोडीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ऊसतोड कामगारांच्या कमतरतेमुळे फडात वेळेवर तोड येत नसल्याने उसाच्या पिकाचे नुकसान होऊ लागले असून ‘कुणी ऊसतोड टोळी देता का टोळी...” अशी विनवणी करण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.

दमदार पाऊस व पाण्याच्या मुबलकतेमुळे यंदा या परिसरात उसाचे पीक जोमात बहरले आहे. पण, तोडणी वेळेत होत नसल्याने उसाला तुरे फुटू लागले आहेत. तुरे निघाल्याने ऊस पोकळ होऊन वजन घटण्याची चिन्हे आहेत. या परिसरातील ऊस कार्यक्षेत्रातील जरंडेश्वर, पडळ, गोपूज, दालमिया या कारखान्यांमार्फत नेला जात आहे. मात्र, मजूर टंचाईमुळे यंदा या कारखान्यांकडे नोंदणी असूनसुद्धा उसाला तोड मिळेल का नाही? असा प्रश्‍न येथील शेतकऱ्यांना सतावत आहे.

दरम्यान, ऊस तोडणीसाठी उशीर झाल्यास उत्पादन घटणार असून, पिकासाठी झालेला खर्च बघता उत्पन्नाचा ताळमेळ बसणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे ऊसतोड मिळावी, यासाठी शेतकऱ्यांकडून सध्या कारखान्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले जात आहेत. मात्र, या समस्येकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.आजमितीला या भागातील ७० टक्के ऊस शिवारात अजूनही तसाच उभा आहे. हा ऊस वेळेवर तुटला नाही तर अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ऊस वेळेवर तुटावा, यासाठी या भागात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या वाढवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Pune Case: ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण, प्रकरण काय?

Konkan Railway: मुंबई-गोवा प्रवासासाठी कोकण रेल्वेचा नवा पर्याय, विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक आणि थांबे

जयगड-चिपळूण-सातारा महामार्गाला वेग, ९८ किलोमीटरच्या मार्गाच्या अहवालाची प्रक्रिया; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

'आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या'; बीडच्या ZP शाळेतील मुलींची रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

SCROLL FOR NEXT