सातारा

विद्यार्थी हितासाठी साता-याच्या शिक्षणाधिका-यांची शाळा, महाविद्यालयांवर नजर

सिद्धार्थ लाटकर

सातारा : विद्यार्थ्यानी फी भरली नाही म्हणून त्यांना ऑनलाईन शिक्षणापासून शाळांनी वंचित ठेवू नये अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी शैक्षणिक संस्थांना दिला आहे.
 
साता-यातील काही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना फी भरा अन्यथा तुम्हांला शैक्षणिक वर्गापासून दूर ठेवू अशी सूचना सातत्याने सांगितली जाते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालक वर्ग शाळांकडून मुदत मागून फी भरतात. काही ठिकाणी मात्र फी भरली जात नसल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यात वाद होताना दिसतात. बहुतांश वेळा हे वाद मिटतात. त्यामुळेच शिक्षण विभाग पर्यंत गोष्टी पोचत नाहीत. काही दिवसांपुर्वी असाच प्रकार एका इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनेकडून झाला. त्यानंतर संतप्त पालकांनी जिल्हा प्रशासनासह शिक्षण विभागात धाव घेतली.

देशप्रेमाने भारावलेला तारळ्यातील 'गजानन' देताे सैनिकांना माेफत वाहन सेवा

पालकांच्या तक्रारींची दखल घेऊन युनिव्हर्सल नॉलेज स्कूल या शाळेस शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी पत्र पाठवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. युनिव्हर्सल नॉलेज स्कूल या शाळेच्या सर्व पालकांनी शाळा पुर्ण क्षमतेने सुरु नसताना सर्व ऍक्‍टीव्हिटी पुर्णाशाने होत नसताना प्रशासन पुर्ण फी साठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवत असून व्हॉटसऍप ग्रुपमधून काढून टाकत असलेबाबत व त्यामुळे पालक व विद्यार्थी यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असलेबाबतची तक्रार करण्यात आली आहे.

त्यानूसार क्षीरसागर यांनी शाळेस पाठविलेल्या पत्रात सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाची पालक शिक्षक संघाच्या सभेमधील ठराव तसेच इतिवृत्ताची प्रत या कार्यालयास दोन दिवसांत सादर करावी. शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याला फी भरली नाही म्हणून ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही याची दक्षता घ्यावी असे नमूद केले आहे.

पालकांनो विश्‍वास ठेवा आणि मुलांना शाळेत पाठवा  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT