सातारा

'अकलूजच्या मोहिते-पाटलांचा नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे भूत पुन्हा जनतेच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न'

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : कृष्णा-भीमा स्थिरीकरण बोगदा व शेतकरी तसेच सर्वसामान्य ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. कृष्णा-भीमा स्थिरीकरण बोगद्याला विरोध कायम असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ. हेमंत पेठे, उद्योजक जीवनशेठ पुकळे, पेडगावचे माजी सरपंच अंकुशराव दबडे, प्रा. अजय शेटे, अशोक काळे, सुरेश माने, सुयोग शेटे, बापूराव काळे उपस्थित होते. 

डॉ. येळगावकर म्हणाले, ""कृष्णा-नीरा-भीमा स्थिरीकरण योजनेच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्रातील कृष्णा व तिच्या उपनद्यांचे पाणी मराठवाड्यात नेण्याचा सर्वपक्षीय प्रस्थापित राजकारण्यांचा घाट आहे. मराठवाड्याला पाणी नेण्यास विरोध नाही. मात्र, हे पाणी बोगद्याद्वारे न नेता जमिनीवरून भुईपाटाने नेण्यात यावे. येरळा व माणगंगा या दोन नद्यांचाही नदीजोड प्रकल्पात समावेश व्हावा.''

केवळ पदावर आहे म्हणून प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडेंना बळीचा बकरा करू नका : माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर 
 
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकलूजच्या मोहिते-पाटील यांनी नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे भूत पुन्हा जनतेच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी त्यांच्या दबावाला बळी पडून या प्रकल्पाला पाठिंबा देवू नये. पाठिंबा देण्यापूर्वी त्यांनी आपल्या वडिलांची भूमिका, पाणी प्रश्नावर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांची मते आजमावून घ्यावीत. त्याचबरोबर त्यांच्या खासदारकीमध्ये खटाव-माण तालुक्‍याच्या मतांचाही मोठा वाटा आहे, हेदेखील त्यांनी लक्षात घ्यावे, असेही त्यांनी नमूद केले. 

वाढत्या वीजबिलांच्या समस्येवर बोलताना डॉ. येळगावकर म्हणाले, ""गेली काही वर्षे कधी ओला तर कधी सुक्‍या दुष्काळामुळे खटाव-माण तालुक्‍यातील शेतकरी हैराण आहेत. या काळात विजेचा वापर अत्यंत कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमुळे छोटे-मोठे उद्योग, व्यावसायिकही हैराण आहेत. अशा परिस्थितीत सर्वच ग्राहक मेटाकुटीला आले असताना एकदम चार-पाच वर्षांची वीजबिले सक्तीने वसूल करणे अत्यंत चुकीचे आहे. वीज कंपनीच्या या अन्यायकारक धोरणाविरुध्द आपण जनमत संघटित करणार आहोत. या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाणार आहे.'' 

एप्रिल फूल एक आठवण 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT