Unique agitation sakal
सातारा

कऱ्हाडला वीज कंपनीच्या कार्यालयासमोर वाजविला ढोल-ताशा

घरांवरून गेलेल्या वीज वाहक तारा हटविण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : पाडळी (ता. कऱ्हाड) येथील घरांवरून गेलेल्या वीज वाहक तारा हटविण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज मुंढे येथील वीज कंपनीच्या येथील कार्यालयासमोर भीम आर्मी संघटनेतर्फे ढोल ताशा वाजवून अनोखे आंदोलन केले. भीम आर्मीचे जावेद नायकवडी यांच्या नेतॉत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत निषेध नोंदवला. भीम आर्मीने निदर्शने तारा न हटविल्यास पुढे तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे.

तालुक्यातील पाडणी येथील इंदिरानगरमध्ये राहत्या घरांवरुन विजवाहक तारा गेल्या आहेत. त्या तारा चार ठीकाणी जोडलेल्या आहेत. त्या तारा चार ठीकाणी जोडल्याने अनेकवेळा जोड निघुन तार घरांवर पडत आहेत. त्याचा धोका तेथील रहवाशांना आहे त्या धोकादायक तारा दुरुस्त कराव्यात, अशी तक्रारी वारंवारा करुनही दखल न घेतल्याने आज आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला.. मंढे येथील वीज कंपनीच्या कार्यालयाबाहेर आज भीमआर्मीतर्फे आंदोलन केले. उपअभियंता श्री. जाधव यांना निवेदन देवुन त्या मागण्यांकेड लक्ष वेधण्याचे आवाहन करण्यात आले. भीमआर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी, जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, पाटण तालुका संघटक फिरोज मुल्ला, कार्याध्यक्ष प्रविण सावंत, इरफान मुल्ला, सरफराज मुल्ला, संजय पाटोळे व पाडळीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT